कोण आहे ठाकरे कुटुंबाचा सुपुत्र? राजकारणात नाही तर सिनेइंडस्ट्रीत धुमाकूळ घालण्यासाठी आहे सज्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 05:44 PM2024-05-21T17:44:38+5:302024-05-21T17:45:05+5:30
उल्लेखनीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, ऐश्वर्यने त्याच्या आडनावासह येणाऱ्या प्रकाशझोतापासून दूर राहून आपल्या कामाद्वारे आपले नाव होण्यास प्राधान्य दिले आहे.
तुम्ही ज्या वंशात जन्म घेता, त्यावरून तुमचा करिअरचा मार्ग निश्चित होतो, असे चित्र राजकारणात हमखास दिसून येते आणि म्हणूनच... याला अपवाद ठरणारा ऐश्वर्य ठाकरे (Aaishvary Thackeray) त्याने अनोखी निवड केल्यामुळे वेगळा ठरतो. त्याचा चुलत भाऊ आदित्य ठाकरे त्यांच्या कुटुंबाचा वारसा पुढे नेत असताना, ऐश्वर्यने मात्र, पारंपरिक मार्ग टाळून सृजनशील क्षेत्रात करिअर करण्याची स्वतःची वाट निवडली आहे.
निवडलेल्या क्षेत्रात स्वत:ला प्रस्थापित करण्यासाठी ऐश्वर्य गेली ५ वर्षे प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्याचा प्रवास एका महत्त्वाच्या प्रकल्पावर सहाय्यक म्हणून सुरू झाला, जिथे त्याने आपली कौशल्ये विकसित केली आणि मोलाचा अनुभव संपादन केला, भविष्यातील प्रयत्नांसाठी पाया तयार केला. उल्लेखनीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, ऐश्वर्यने त्याच्या आडनावासह येणाऱ्या प्रकाशझोतापासून दूर राहून आपल्या कामाद्वारे आपले नाव होण्यास प्राधान्य दिले आहे.
ज्यांनी त्याचे काम जवळून पाहिले आहे, त्यांनी- त्याची अद्वितीय प्रतिभा आणि त्याच्यातील क्षमता पाहून, त्याने निवडलेल्या उद्योगात चिरस्थायी प्रभाव टाकणारे अनमोल रत्न अशी उपमा देत, त्याची प्रशंसा केली आहे. दरम्यान, सर्वांच्या नजरा ‘या अनोख्या ठाकरे’कडे वळल्या आहेत, जो त्याने निवडलेल्या क्षेत्रात भरारी घेण्यास सज्ज आहे.
ठाकरे यांच्या निकटच्या स्रोताने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऐश्वर्य चित्रपटांच्या सेटवर स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी पाच वर्षे झटत आहे. सहाय्यक म्हणून चित्रपटांबद्दल तपशीलवार काम शिकत आहे. त्याला कला आणि संगीतात प्रचंड रस आहे. चित्रपट, संगीत आणि कला हा त्याच्या करिअरचा मुख्य मार्ग असेल.’ त्यांनी पुढे नमूद केले की, ‘आगामी वर्षभरात ऐश्वर्यला घेऊन मोठ्या प्रकल्पाच्या घोषणा झाल्या, तर त्यात आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही.’