​कोण म्हणत, वर्कआऊटसाठी जिम हवेच? पाहा सिद्धार्थचा हा व्हिडिओ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2016 03:27 PM2016-11-17T15:27:09+5:302016-11-17T15:27:09+5:30

गतवर्षी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘ब्रदर्स’ हा सिनेमा आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार व सिद्धार्थची जोडी दिसली दिली. हा सिनेमा आठवायचे कारण म्हणजे, यासाठी सिद्धार्थने गाळलेला घाम.

Who says, a gym for a workout? Watch this video of Siddhartha! | ​कोण म्हणत, वर्कआऊटसाठी जिम हवेच? पाहा सिद्धार्थचा हा व्हिडिओ!

​कोण म्हणत, वर्कआऊटसाठी जिम हवेच? पाहा सिद्धार्थचा हा व्हिडिओ!

googlenewsNext
वर्षी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा याचा ‘ब्रदर्स’ हा सिनेमा आला होता. या चित्रपटात अक्षय कुमार व सिद्धार्थची जोडी दिसली दिली. हा सिनेमा आठवायचे कारण म्हणजे, यासाठी सिद्धार्थने गाळलेला घाम. होय, या चित्रपटातील भूमिकेची गरज म्हणून टोन्ड बॉडी मिळवण्यासाठी सिद्धार्थने जीममध्ये कधी नव्हे इतका घाम गाळला होता. सिद्धार्थ बॉलिवूडमध्ये ‘न्यू कमर्स’च्या यादीत असला तरी मोठ-मोठे स्टार्स त्याचे कष्ट आणि चिकाटीचे प्रशंसक आहेत. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, अ‍ॅक्टिंगसोबत फिटनेसबाबतही तो तितकाच सजग आहे. सध्या सिद्धार्थ न्यूझीलंडमध्ये आहे. न्यूझीलंड टुरिजमचा पहिला भारतीय अ‍ॅम्बिसीडर या नात्याने सध्या तो या देशातील प्रेक्षणीय स्थळे आणि तेथील संस्कृतीचे दर्शन घडवतोय. टिष्ट्वटर ते इन्स्टाग्राम अशा सर्व ठिकाणी सिद्धार्थच्या न्यूझीलंडमधील फोटोंची रेलचेल आहे. पण यातच त्याच्या एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. यात सिद्धार्थ वर्कआऊट करताना दिसतोय. पण जिममध्ये नाही तर घरी. होय, ‘जिमला जाऊ शकत नसाल तर काहीही हरकत नाही. पण बहाने करू नका, प्रयत्न सोडू नका,’अशा कॅप्शनसह त्याने हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्यायामासाठी जिममधील महागड्या आणि प्रगत उपकरणांची गरज नाही तर त्यासाठी तुमची सॅक, बेडरोल, पिलो अशा सगळ्या वस्तूही पुरेशा आहेत, असा मॅसेज सिद्धार्थ या व्हिडिओतून देतोय.
हा व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रेरणा घेऊ शकता. तेव्हा तुम्हीही बघा...!!

{{{{twitter_video_id####}}}}

Web Title: Who says, a gym for a workout? Watch this video of Siddhartha!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.