श्रुती हसनचा ‘मिस्ट्री’ बॉयफ्रेंड आहे तरी कोण? जाणून घ्या त्यांची ‘सिक्रेट’ लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2017 05:26 AM2017-02-16T05:26:31+5:302017-02-16T10:58:12+5:30

श्रुती हसन पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपसाठी चर्चेत आली आहे. सध्या अशी ‘अफवा’ आहे की, ती तिच्या मॅनेजरला डेट करीत ...

Who is Shruti Hasan's 'Mystery' Boyfriend? Know their 'Secret' Lovestory | श्रुती हसनचा ‘मिस्ट्री’ बॉयफ्रेंड आहे तरी कोण? जाणून घ्या त्यांची ‘सिक्रेट’ लव्हस्टोरी

श्रुती हसनचा ‘मिस्ट्री’ बॉयफ्रेंड आहे तरी कोण? जाणून घ्या त्यांची ‘सिक्रेट’ लव्हस्टोरी

googlenewsNext
रुती हसन पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशिपसाठी चर्चेत आली आहे. सध्या अशी ‘अफवा’ आहे की, ती तिच्या मॅनेजरला डेट करीत आहे. जेव्हापासून त्या दोघांचे विमानतळावरील फोटो बाहेर आले तेव्हापासून अशा चर्चांना उधाण आले. त्यामुळे सहाजिकच या ‘रहस्यमयी’ बॉयफे्रंडविषयी अधिक जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता असणार.

तर सर्वप्रथम श्रुतीच्या बॉयफ्रेंडचे नाव मायकल कॉरसेल आहे. ते दोघे कधी, कु ठे, कसे भेटले याविषयी अद्याप काही माहिती नसली तरी ते एकमेकांना डेट करीत आहेत एवढे मात्र नक्की. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, तीन महिन्यांपासून ते सोबत आहेत. होय! तीन महिने.

 ALSO READ: रणबीरबद्दल विचारल्यावर का खवळली श्रुती?

त्याआधी ती ‘यारा’ को-स्टार विद्यूत जामवालला डेट करीत होती मात्र दोघांमध्ये काही तरी बिनसले आणि ते वेगळे झाले. त्यानंतर मायकलचा तिच्या जीवनामध्ये प्रवेश झाला. येथे एक गोष्टीचा खुलासा करण्याची गरज आहे की, मायकल तिचा मॅनेजर नाही. तो लंडनस्थित एक अभिनेता आहे. ‘ड्रामा सेंटर लंडन’ आणि ‘ब्रायन टिमोनी अ‍ॅक्टर्स स्टुडिओ’ येथून त्याने अभिनयाचे प्रशिक्षण घेतले आहे.

                                           Shruti Micheal

                                           Shruti Micheal

                                           Shruti Micheal
                                        न्यू कपल इन टाऊन: श्रुती हसन आणि मायकल कॉरसेल 

त्याने काही चित्रपटांमध्येसुद्धा काम केलेले आहे. त्यासोबतच तो टीव्ही आरणि नाटकांमध्येही काम करतो. तसेच त्याने शॉर्ट फिल्म्समध्येसुद्धा काम केले आहे. आता ते दोघे ही रिलेशिनशिप गांभीर्याने पुढे नेण्याचा विचार करीत आहे का हे तर येण्याऱ्या काही दिवसांमध्ये कळेलच.

‘लव्ह लाईफ’बद्दल सुरू असणाऱ्या चर्चांनी श्रुती मात्र हैराण झाली आहे. तिच्या प्रवक्त्यामार्फत तिने सांगितले की, ‘यापूर्वीही कधी मी माझे खासगी जीवनाबाबत सार्वजनिकरीत्या बोलले नाही आणि यापुढेदेखील बोलणार नाही.’ मात्र नुकतेच तिने सोशल मीडियावर एक रोमॅण्टिक पोस्ट केले होते. आता एक अर्थाने अप्रत्यक्षरीत्या का होईना पण तिने प्रेमाची कबुली दिली.

ALSO READ: श्रुती हसन ​रणबीरची नवी लेडीलव्ह?

Web Title: Who is Shruti Hasan's 'Mystery' Boyfriend? Know their 'Secret' Lovestory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.