​नवाजुद्दीन सिद्दीकीचा खरा सुपरहिरो कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2016 10:07 PM2016-12-08T22:07:15+5:302016-12-08T22:07:15+5:30

हॉलिवूडमध्ये सुपरमॅन व स्पायडरमॅन हे सुपरहिरो आहेत. अनेकांना सुपरहिरोच्या गोष्टी आवडतात, सर्वांचा एक सुपरहिरो असतोच. पण अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा ...

Who is the true super hero of Nawazuddin Siddiqui? | ​नवाजुद्दीन सिद्दीकीचा खरा सुपरहिरो कोण?

​नवाजुद्दीन सिद्दीकीचा खरा सुपरहिरो कोण?

googlenewsNext
ong>हॉलिवूडमध्ये सुपरमॅन व स्पायडरमॅन हे सुपरहिरो आहेत. अनेकांना सुपरहिरोच्या गोष्टी आवडतात, सर्वांचा एक सुपरहिरो असतोच. पण अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा सुपरहिरो इतरांपेक्षा जरा वेगळा आहे. नवाजुद्दीनसाठी ‘सुलताना’ ही सुपरहिरो असल्याचे तो म्हणतोय.

नवाजुद्दीन सिद्दीकीने बॉलिवूडमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. खलनायकापासून ते थेट नायकापर्यंत त्याने साकारलेल्या भूमिके त जीव ओतण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. लवकर नवाजुद्दीन सुपरहिरोच्या भूमिकेत दिसणार असून त्यासाठी त्याने चांगलीच तयारी केली आहे. मात्र त्याच्यासाठी आजही त्याच्या बालपणीचा सुलताना डाकू हाच सुपरहीरो असल्याचे त्याने सांगितले. 

नवाजुद्दीन म्हणतो, लहान मुलांना सुपरहिरो आवडतात. मात्र माझ्यासाठी सुल्ताना हीच सुपरहिरो आहे. आपल्या जुण्या आठवणींना उजाळा देत नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणाला, गावांत राहत असताना आमच्या गावात वीज नसल्याने मेनबत्तीच्या प्रकाश हाच आमच्यासाठी मोठा होता. थंडीच्या दिवसांत आम्ही एका गरम रजाईत घुसल्यावर माझे अब्बा आम्हाला कथा सांगत असे. ही गोष्ट आमच्यासाठी आनंददायी होती. त्यावेळी तेथे दरोडेखोरांचा धुमाकुळ होता. वडील कथा सांगत असताना सुलताना दरोडेखोरांचा कसा सामना करतो हे सांगत असे. आजही माझ्यासाठी तोच सुपरहिरो आहे असे नवाजुद्दीन म्हणाला. 

हिराज मर्ताफिया यांच्या आगामी चित्रपटात नवाजुद्दीन एका सुपरहिरोची भूमिका साकारणार आहे. यासाठी नवाजुद्दीन सध्या चांगलीच तयारी करीत आहे. यामुळे त्याला सुपरहिरोच्या चरित्राविषयी बरीच माहिती गोळा केली आहे. नवाजुद्दीन हा मूळचा उत्तरप्रदेशातील मुज्जफरनगर या जिल्ह्यातील असून लोकांच्या मते एकेकाळी तेथे सुलताना या दरोडेखोराची दहशत होती. मात्र लोकांनी सांगितलेल्या कथानकानुसार तो गरिबांचा मसिहा होता. 

Web Title: Who is the true super hero of Nawazuddin Siddiqui?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.