कोण आहे पूजा ददलानी?; शाहरुख खानसाठी का आहे एवढी 'स्पेशल'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 11:19 AM2022-02-08T11:19:07+5:302022-02-08T12:00:11+5:30

Shahrukh Khan - Pooja Dadlani : शाहरूख खान आणि या महिलेचा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांना वाटलं की, ही शाहरूख खानची पत्नी गौरी असेल.

Who was the women accompanied with Shah Rukh Khan to Lata Mangeshkar funeral? | कोण आहे पूजा ददलानी?; शाहरुख खानसाठी का आहे एवढी 'स्पेशल'

कोण आहे पूजा ददलानी?; शाहरुख खानसाठी का आहे एवढी 'स्पेशल'

googlenewsNext

भारतरत्न लता मंगेशकर यांचं ६ जानेवारीला निधन झालं. बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये आले होते. यावेळी बॉलिवूड किंग शाहरूख खानही (Shahrukh Khan) आला होता. यावेळी शाहरूख खानसोबत एक महिलाही दिसली. त्यांचा फोटो व्हायरल झाला आणि शाहरूखसोबतही ही महिला कोण? असा प्रश्न लोकांना पडला. अनेकांना वाटलं की, शाहरूख खानसोबत त्याची पत्नी गौरी असेल. पण ती गौरी नव्हती. मग ती कोण होती? चला जाणून घेऊ तिच्याविषयी....

शाहरूख खान आणि या महिलेचा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहतानाचा फोटो व्हायरल झाला. त्यानंतर अनेकांना वाटलं की, ही शाहरूख खानची पत्नी गौरी असेल. पण तसं नाहीये. तुम्हालाही कन्फ्यूजन झालं असेल तर आम्ही ते दूर करतो. ही महिला आहे शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी (Pooja Dadlani). त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत शाहरूख खानसोबत दिसल्यावर अनेकांना असाही प्रश्न पडला असेल की, पूजा ददलानी शाहरूख खानसाठी इतकी महत्वाची का आहे? की इतक्या मोठ्या ठिकाणी तो तिच्यासोबत आला.

अनेक गोष्टींसाठी पूजावर अवलंबून असतो शाहरूख

बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खानचं खणखणीत नाणं पूर्ण इंडस्ट्रीवर चालतं. पण स्वत: शाहरूख खान आपली मॅनेजर पूजा ददलानीवर बराच निर्भर असतो. पूजा ही केवळ शाहरूख खानची मॅनेजरच नाही तर त्याच्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीसोबत तिचं खास रिलेशन आहे. 

एकप्रकारे बघितलं तर पूजा ददलानी शाहरूख खानच्या परिवाराचा महत्वाचा भाग आहे. ती शाहरूखच्या कामासोबतच परिवाराच्या इतर गोष्टींचीही काळजी घेते. जसे की, प्रत्येक ट्रिप, फिरायला जाणं, मिटिंग्स, प्लानिंग हे सगळं पूजा सांभाळते.

गौरी खानची खास मैत्रीण

पूजा ददलानी केवळ शाहरूख खानचं काम बघते असं नाही तर ती शाहरूख खानची पत्नी गौरीची खास मैत्रीण झाली आहे. गौरीचं करिअरही वाढवण्यात तिने मोठी मेहनत घेतली आहे. फॅशन टिप्सपासून ते पार्टीचं आयोजन कसं असेल इथपर्यंत सगळं पूजा बघते. 

शाहरूखच्या मुलांसोबत खास नातं

असं सांगितलं जातं की, शाहरूख खानचा छोटा मुलगा अबराम खानला पूजा ददलानी फार आवडते. पूजा ददलानी नेहमी अबरामच्या जवळच असते. ती सुद्धा त्याची खास काळजी घेते. इतकंच नाही तर आर्यन खान आणि सुहाना खानसोबतही पूजाचं चांगलं बॉन्डींग आहे. जेव्हा आर्यन खान ड्रग्स केसप्रकरणी तुरूंगात होता तेव्हा सगळ्यात समोर पूजा होती. ती कोर्टात सुनावणीवेळी हजर राहत होती. त्यावेळी ती अधिक चर्चेत आली होती.
 

Web Title: Who was the women accompanied with Shah Rukh Khan to Lata Mangeshkar funeral?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.