हृतिक रोशनबरोबर कोण करणार रोमांस; कॅटरिना कैफ की दीपिका पादुकोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2017 12:00 PM2017-04-13T12:00:53+5:302017-04-13T18:11:27+5:30

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा फेव्हरेट दिग्दर्शक कबीर खान यांनी हृतिक रोशनबरोबर एक चित्रपट साइन केल्याच्या चर्चेला आता बळकटी ...

Who will romance with Hrithik Roshan? Katrina Kaif Deepika Padukone? | हृतिक रोशनबरोबर कोण करणार रोमांस; कॅटरिना कैफ की दीपिका पादुकोण?

हृतिक रोशनबरोबर कोण करणार रोमांस; कॅटरिना कैफ की दीपिका पादुकोण?

googlenewsNext
लिवूडचा दबंग सलमान खान याचा फेव्हरेट दिग्दर्शक कबीर खान यांनी हृतिक रोशनबरोबर एक चित्रपट साइन केल्याच्या चर्चेला आता बळकटी मिळाली आहे. मात्र चित्रपटात हृतिकची हिरोइन कोण असेल हे अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकले नसले तरी, कॅटरिना कैफ आणि दीपिका पादुकोण यांच्यात जबरदस्त फाइट असल्याचे समजते. 

जेव्हा आम्ही याविषयीची विस्तृत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा दीपिका पादुकोण, कॅटरिना कैफ आणि क्रिती सॅनन यांच्यात जबरदस्त फाइट सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. सुरुवातीला कॅटरिना कैफ हिचे नाव निश्चित समजले जात होते. परंतु आता आलेल्या माहितीनुसार दीपिका या रेसमध्ये आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वीच ही माहिती समोर आली होती की, कबीर खान यांनी हृतिकवरच त्याची हिरोइन साइन करण्याची जबाबदारी सोपविली होती. हृतिकनेदेखील आपल्याला दिलेली जबाबदारी पार पाडताना कॅटरिनाचे नाव निश्चित केले होते. 



या अगोदर हृतिक आणि कॅटरिना ही जोडी ‘बॅँग बॅँग’, ‘जिंदगी मिलेगी ना दोबारा’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. त्यामुळेच कदाचित हृतिकने कॅटरिनाचे नाव निश्चित केले होते. मात्र डीएनएला मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाची कॅटला आॅफरच दिली गेली नाही. त्यामुळे तिला चित्रपट साइन करण्याबाबतचा प्रश्नच निर्माण होत नाही. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक कबीर खान दीपिका आणि क्रिती यांच्या नावावर विचार करीत आहेत. त्यातही दीपिकाचे नाव आघाडीवर आहे. जर हृतिकबरोबर दीपिकाचे नाव निश्चित झाल्यास दोघांना एकत्र काम करताना बघणे खरोखरच मजेशीर असेल. दीपिकाने नुकतेच शाहरूखसोबतच्या आॅफरला रिजेक्ट केले होते. 

दरम्यान, या चित्रपटामध्ये दीपिका आणि कॅटचे नाव पुढे आल्याने दोघींमधील वादाला आणखी पुढे सुरू ठेवण्यास निमित्तच मिळाले आहे. त्यामुळे या कारणामुळेदेखील दोघींमधील कोल्डवॉर आणखी रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे हृतिकच्या ‘काबिल’ने बॉक्स आॅफिसवर चांगली कमाई केल्याने त्याच्याकडे चित्रपटाच्या एकापाठोपाठ एक  आॅफर्स येत आहेत. 

Web Title: Who will romance with Hrithik Roshan? Katrina Kaif Deepika Padukone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.