कल्कीच्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहे तरी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2017 03:52 PM2017-01-03T15:52:27+5:302017-01-03T15:54:34+5:30
कल्की कोच्लिन म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ गर्ल. स्वत:चे विचार परखडपणे बोलून दाखवणाºया बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींमध्ये कल्कीचाही समावेश होतो. अलीकडे एका ...
क ्की कोच्लिन म्हणजे बॉलिवूडची ‘बेफिक्रे’ गर्ल. स्वत:चे विचार परखडपणे बोलून दाखवणाºया बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींमध्ये कल्कीचाही समावेश होतो. अलीकडे एका मुलाखतीतही कल्कीने तिच्या याच स्वभावाचे दर्शन घडवले. होय, स्त्रीवाद, मैत्री, बॉलिवूडमधील घडामोडी आणि स्वत:चे नववर्षाचे प्लान याबद्दल कल्की बरेच काही बोलली. बॉलिवूडमधील कोण कलाकार तुला खºया अर्थाने प्रभावित करतात, प्रेरित करतात? असा एक प्रश्न कल्कीला विचारण्यात आला. यावर कल्कीने कुठलेही डिप्लोमॅटीक उत्तर न देता अगदी प्रामाणिकपणे काही कलाकारांची नावे घेतली. यातले सगळ्यांत पहिले नाव होते, कंगना राणौत हिचे. कंगना मला नेहमीच प्रभावित करते. व्यावसायिक आणि व्यक्तिगत अशा दोन्ही गोष्टी कंगना अतिशय संतुलीत पद्धतीने हाताळले. तिचा हा स्वभाव मला खूप प्रभावित करतो. कंगनाशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खान खांचा अभिनय मला प्रेरित करतो. रणबीर कपूरवर तर मी अक्षरश: फिदा आहे. या सगळ्यांपासून मी शिकते, असे कल्की म्हणाली.
बॉलिवूड फ्रेन्डबद्दलही ती बोलली. माझ्यामुळे इंडस्ट्रीतील कुणालाही धोका नाही. शिवाय माझे इंडस्ट्रीत कुणाशीही भांडण नाही. निश्चितपणे बॉलिवूडमध्ये माझे अनेक मित्र आहे. विशेषत: झोया अख्तर हिच्यासोबत माझे चांगले बॉन्डिंग आहे. ‘ये जवानी है दिवानी’ची अख्खी गँग माझ्या फ्रेन्डलिस्टमध्ये आहे. दीपिका पादुकोण, रणबीर कपूर, अयान मुखर्जी हे सगळेच. आम्ही रोज भेटत नाही. पण जेव्हा केव्हा भेटतो तेव्हा धम्माल करतो. माझी इंडस्ट्रीत कुणाशीही स्पर्धा नाही. मी बरी व माझे काम बरे, असा माझा स्वभाव आहे. कदाचित त्यामुळे सगळ्यांशीच माझे जमते,असे कल्कीने सांगितले.
कल्की फेमिनिस्ट आहे का? या प्रश्नावरही कल्की बिनधास्त बोलली. बरेचदा पुरूषांचा राग करणाºया महिला म्हणजे,फेमिनिस्ट असा साधा-सरळ अर्थ काढला जातो. मी अशातली नाही.माझ्या मते, फेमिनिस्ट म्हणजे, एकार्थाने स्त्री-पुरूष समानतेचा आग्रह धरणारी मानसिकता. मी अशा मानसिकतेची आहे का तर नक्की आहे. यासाठी कुणी मला फेमिनिस्ट म्हणत असेल तर ती मी आहे, असे ती म्हणाली.