आमिर खान ‘ओशो’ साकारण्यात उत्सूक, पण सतावतेय ही एक भीती!!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 12:36 PM2018-07-24T12:36:49+5:302018-07-24T12:40:45+5:30

दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशो यांच्या बायोपिकची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. या बायोपिकमध्ये आमिर खान ओशोंची भूमिका साकारणार, अशीही चर्चा आहे.

this is why aamir khan has not given his green signal to osho biopic | आमिर खान ‘ओशो’ साकारण्यात उत्सूक, पण सतावतेय ही एक भीती!!

आमिर खान ‘ओशो’ साकारण्यात उत्सूक, पण सतावतेय ही एक भीती!!

दिवंगत आध्यात्मिक गुरू ओशो यांच्या बायोपिकची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरु आहे. या बायोपिकमध्ये आमिर खान ओशोंची भूमिका साकारणार, अशीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी आमिरने या चित्रपटासाठी लूक टेस्ट दिली, अशीही खबर आली. पण ताजी बातमी खरी मानाल तर आमिरने अद्याप या बायोपिकला हिरवी झेंडी दिलेली नाही, होय, सूत्रांचे मानाल तर आमिरने या बायोपिकला अद्यापही होकार दिलेला नाही. तूर्तास ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ या चित्रपटावर त्याने त्याचे संपूर्ण लक्ष केंद्रीत केले आहे.
खरे सांगायचे तर, आपल्या अन्य चित्रपटांप्रमाणेच ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’ची सगळी सूत्रेही आमिरने आपल्या हाती घेतली आहेत. पोस्ट प्रॉडक्शनच्या सगळ्या कामावर त्याचे जातीने लक्ष आहे. त्यामुळे तूर्तास तरी ओशोच्या बायोपिकसाठी त्याच्याकडे वेळ नाही. पण याशिवाय या बायोपिकला सध्या होकार न देण्यामागे आणखी एक कारण आहे. सूत्रांचे मानाल तर, ओशोंचे बायोपिक अनेकार्थाने संवेदनशील असणार आहे. ते वादात सापडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आमिर जरा दचकून आहे. याच कारणाने हे बायोपिक प्लान करणारे शकुन बत्रा यांना आमिरने अद्याप होकार दिलेला नाही. या बायोपिकला होणारा संभाव्य विरोध टाळण्यासाठी जे काही करता येईल, ज्या काही परवानग्या लागतील, आधी त्या मिळवा आणि नंतर बोला, असे आमिरने त्यांना कळवले असल्याचे कळतेय. तोपर्यंत आमिर ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मधूनही मोकळा होणार आहे. लवकरच आमिर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी होणार आहे. ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’मध्ये आमिरसोबत अमिताभ बच्चन, कॅटरिना कैफ, फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत आहेत. हा सिनेमा १९३९ साली आलेल्या ‘कन्फेशन्स आॅफ ए ठग’ या कादंबरीवर आधारित असल्याचे सांगण्यात येत आहे.  संबंधित कादंबरीत आमिर अली नावाचा एक ठग असतो आणि तो इंग्रजांच्या नाकीनऊ आणतो. तो एक पठाण आहे. इस्माईल नावाचा एक मोठा ठग त्याला जवळ करतो आणि मुलासारखे वाढवतो. आमिर अली त्याचे मित्र बद्रीनाथ आणि पीर खानसोबत ठगबाजी सुरू करतो. यात गणेशा आणि चीता त्याची मदत करतात. नंतर आमिर अली मोठा जमीनदार बनतो, असे याचे कथानक आहे. कादंबरीतील आमिर अलीचे हेच पात्र आमिर साकारतो आहे.

 

Web Title: this is why aamir khan has not given his green signal to osho biopic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.