रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2023 13:30 IST2023-03-06T13:30:00+5:302023-03-06T13:30:00+5:30

Rekha: रेखा यांच्या सिंदूर लावण्यामागचं खरं कारण आलं समोर

why actress rekha put sindoor in her head bollywood news | रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

रेखा यांच्या भांगेत कोणाचं कुंकू? अखेर बऱ्याच वर्षांनी खुद्द अभिनेत्रीने केला खुलासा

उत्तम अभिनय आणि सौंदर्य यांच्या जोरावर एक काळ गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे रेखा. आजही रेखा यांचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे त्यांचा कलाविश्वात फारसा वावर जरी नसला तरीदेखील त्यांची चर्चा वरचेवर होत असते. रेखा यांचं फिल्मी करिअर जसं चर्चेत राहिलं तशीच त्यांची पर्सनल लाइफही चर्चेत राहिली आहे. किंबहुना अजूनही त्यांच्या वैयक्तिक जीवनाची चर्चा होताना दिसते. यात खासकरुन त्या लावत असलेल्या सिंदूरची कायमच चर्चा होते. रेखा नेमकं कोणाच्या नावाने हे कुंकू लावत असतील असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. अखेर या प्रश्नाचं उत्तर खुद्द अभिनेत्रीने दिलं आहे.

रेखा यांचं वैवाहिक जीवन आणि लव्हलाइफ बरीच गुंतागुंतीची असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. यात बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांच्यासोबत असलेलं त्यांचं नातं बरंच गाजलं. इतकंच नाही तर त्यांची प्रेमकहाणी चक्क कॉन्ट्रोवर्शिअल झाली. इतकंच नाही तर त्यांचं नाव संजय दत्तसोबतही जोडलं गेलं होतं. त्यामुळे रेखा नेमकं कोणाच्या नावाचं कुंकू लावतात हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर या प्रश्नाचं उत्तर अभिनेत्रीने दिलं आहे.

कोणाच्या नावाचं आहे रेखा यांच्या भांगेत कुंकू?

१९९० मध्ये  रेखा यांनी बिझनेसमन मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. काही महिन्यातच ते विभक्त झाले. घटस्फोटानंतर मुकेश यांनी रेखाच्या ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे नवऱ्याच्या मृत्यूनंतरही त्या कोणाच्या नावाचं सिंदूर लावतात असा प्रश्न निर्माण झाला होता. इतकंच नाही तर अनेकांनी या सिंदूरचा संबंध बिग बी आणि संजय दत्त यांच्याशीही जोडला. मात्र, हे साफ खोट असल्याचं रेखाने सांगितलं.
"मी कोणाच्याही नावाचं सिंदूर लावत नाही. मला सिंदूर लावायला आवडतं आणि एक फॅशन म्हणून मी ते लावते. मी लावलेलं सिंदूर माझ्या मेकअपला सूट होतं आणि मला शोभून दिसतं त्यामुळे मी लावते", असं रेखा यांनी एका मुलाखतीत सांगितलं.
 

Web Title: why actress rekha put sindoor in her head bollywood news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.