का तुटली अजय देवगण व शाहरूख खानमधील मैत्री? का एकत्र केला नाही एकही सिनेमा?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 11:22 AM2020-01-30T11:22:40+5:302020-01-30T11:24:48+5:30

31 वर्षांच्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये शाहरूख व अजयने एकत्र एकही सिनेमा केला नाही. असे का?

Why Ajay Devgn and ShahRukh Khan not put together a movie | का तुटली अजय देवगण व शाहरूख खानमधील मैत्री? का एकत्र केला नाही एकही सिनेमा?

का तुटली अजय देवगण व शाहरूख खानमधील मैत्री? का एकत्र केला नाही एकही सिनेमा?

googlenewsNext
ठळक मुद्दे2012 मध्ये पुन्हा चित्रपटाचेच निमित्त झाले आणि त्यांच्यातील मतभेद जगापुढे आलेत.

रिअल लाईफमध्येही शाहरूख खान व काजोल एकमेकांचे चांगले मित्र आहेत, हे कुणापासूनच लपून नाही. गेल्या 25 वर्षांपासून त्यांची मैत्री टिकून आहे. पण आश्चर्याची बाब म्हणजे, शाहरूख व काजोलचा पती अजय देवगण या दोघांत मात्र तेवढेच औपचारिक नाते आहे. म्हणजेच दोघेही केवळ हाय-हॅलोपुरते मित्र आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण 31 वर्षांच्या बॉलिवूडमधील करिअरमध्ये शाहरूख व अजयने एकत्र एकही सिनेमा केला नाही. असे का? तर यामागेही एक कारण आहे. होय, आज आम्ही हेच कारण तुम्हाला सांगणार आहोत.

शाहरूख व अजय पूर्वापार मित्र नव्हते, असे नाही. एकेकाळी दोघांचीही चांगली मैत्री होती. पण 1995 मध्ये असे काही झाले की, दोघांमध्ये दुरावा आला. आजपर्यंत हा दुरावा मिटू शकला नाही.
1995 साली राकेश रोशन यांनी ‘करण अर्जुन’ हा सिनेमा करायला घेतला आणि  या चित्रपटासाठी त्यांनी मुख्य अभिनेत्यांचा शोध सुरू केला. यादरम्यान या चित्रपटासाठी त्यांनी सनी देओल आणि अजय देवगण यांना साईन केले. पण ऐनवेळी सनी देओलने हा चित्रपट करण्यास नकार दिला. अशास्थितीत राकेश रोशन यांनी सनीच्या जागी शाहरूखचे नाव फायनल केले. शाहरूख व अजयला त्यांच्या भूमिकाही वाटून दिल्यात. परंतु कथा ऐकल्यावर अजयने राकेश रोशन यांना भूमिकांची अदलाबदल करण्याची गळ घातली. म्हणजेच, शाहरूखच्या वाट्याची भूमिका त्याला द्यावी आणि त्याची भूमिका शाहरूखला द्यावी, अशी मागणी केली. याचे कारण काय तर शाहरूखचे कॅरेक्टर अधिक दमदार असल्याचे अजयला वाटत होते. अजयने केलेल्या या मागणीने राकेश रोशन विचारात पडले. अखेर त्यांनी शाहरूख व अजय यांनी आपआपसांत  चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा पर्याय सुचवला. त्यानुसार, अजय व शाहरूख एकत्र बसले. पण भूमिकांची अदलाबदल करण्याऐवजी दोघांनीही हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. अजयने चित्रपट सोडला. पण महिनाभरानंतर शाहरूख अद्यापही हा चित्रपट करतोय, हे ऐकून त्याला धक्काच बसला. झाले नेमक्या याच कारणावरून शाहरूख व अजय यांच्यात कोल्डवॉर सुरु झाले. तेव्हापासून अजय व शाहरूख कधीही कोणत्याही चित्रपटासाठी एकत्र आले नाहीत.

अजयची पत्नी काजोल व शाहरूख यांची मैत्री होती. पण यापश्चातही अजय व शाहरूख कधीच एकमेकांचे मित्र बनू शकले नाहीत. काजोलनेही त्यासाठी दोघांवर दबाव टाकला नाही.

शाहरूख व अजयने आपआपसातील मतभेद कधीही चव्हाट्यावर आणले नाहीत. पण हो, 2012 मध्ये पुन्हा चित्रपटाचेच निमित्त झाले आणि त्यांच्यातील मतभेद जगापुढे आलेत.  2012 मध्ये अजय देवगणचा ‘सन आॅफ सरदार’ हा सिनेमा रिलीज झाला होता. नेमक्या त्याच तारखेला शाहरुखचा ‘जब तक है जान’ हा चित्रपट रिलीज झाला. दोघांचे चित्रपट एकमेकांवर भारी पडले. चित्रपट एक्स्पर्ट्सच्या मते, हे दोन्ही चित्रपट वेगवेगळ्या दिवशी रिलीज झाले असते तर कदाचित दोन्ही चित्रपट अजून चांगला व्यवसाय करू शकले असते. त्यावेळी अजयने पहिल्यांदा मनातील खदखद बोलून दाखवली होती. होय, यशराजने आपली प्रतिष्ठा आणि पॉवर यांचा वापर करून शाहरुखच्या ‘जब तक है जान’ चित्रपटासाठी जास्त स्क्रीन्स विकत घेतल्यामुळे ‘सन आॅफ सरदार’ला जास्त स्क्रीन्स मिळू शकल्या नाहीत, असा आरोप अजयन केला होता. त्याचा हा आरोप बरेच काही सांगणारा होता.  

Web Title: Why Ajay Devgn and ShahRukh Khan not put together a movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.