Amitabh Bachchan : “...म्हणून मी जयाशी लग्न केलं...”, अमिताभ बच्चन यांनी लग्नाच्या इतक्या वर्षानंतर सांगितलं सीक्रेट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 10:37 AM2022-11-16T10:37:22+5:302022-11-16T10:41:02+5:30
Kaun Banega Crorepati 14, Amitabh Bachchan : ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर अमिताभ बच्चन गप्पांच्या ओघात अनेक सीक्रेट सांगून जातात. आता अमिताभ यांनी एक असंच सीक्रेट सर्वांसमोर उघड केलं...
‘कौन बनेगा करोडपती’च्या (Kaun Banega Crorepati 14) सेटवर अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) खासगी आयुष्याबद्दलचे अनेक खुलासे करताना दिसतात. गप्पांच्या ओघात ते अनेक सीक्रेट सांगून जातात. आता अमिताभ यांनी एक असंच सीक्रेट सर्वांसमोर उघड केलं. होय, केबीसीच्या मंचावर बिग बींनी आपल्या लग्नाबद्दल खुलासा केला.
तर त्याचं झालं असं की, एक महिला स्पर्धक हॉटसीटवर बसली. आधी तिने आपली ओळख करून दिली. या महिला स्पर्धकाचे लांबसडक केस पाहून अमिताभ तिचं कौतुक करायला लागले. देवीजी, तुमचे केस फारच सुंदर आहेत, असं अमिताभ म्हणतात.
महानायक आपल्या केसांचं कौतुक करत आहेत म्हटल्यावर ती महिला स्पर्धक जरा लाजते. यानंतर अमिताभ एक खुलासा करतात. ‘मी माझ्या पत्नीशी लग्न केलं याच कारणासाठी केलं होतं. कारण तिचे केस खुप लांब होते,’ असं अमिताभ म्हणतात. अमिताभ यांनी लांब केस इतके आवडतात, हे आत्तापर्यंत क्वचितच कुणाला ठाऊक असेल. जया( Jaya Bachchan ) यांच्यासोबत अमिताभ यांनी त्यांच्या लांब केसांमुळे लग्न केलं, हेही आजपर्यंत कुणाला ठाऊक नव्हते.
अमिताभ व जया यांचं लग्न 1973 साली झालं. दोघांनाही अभिषेक व श्वेता अशी दोन मुलं आहे. अमिताभ व जया यांची लव्हस्टोरी देखील फिल्मी आहे. दोघांची भेट झाली तेव्हा अमिताभ स्ट्रगल करत होते आणि जया एक सुपरस्टार होत्या. ‘गुड्डी’ या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं आणि याच सेटवर दोघं एकमेकांच्या पे्रमात पडले. 3 जून 1973 रोजी दोघांचं लग्न झालं.
जया बच्चन आणि अमिताभ बच्चन यांच्या लग्नाला 49 वर्षे झाली आहे. पुढच्या वर्षी अमिताभ बच्चन आणि जया बच्चन लग्नाचा 50 वा वाढदिवस साजरा करणार आहेत.
अमिताभ यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, गेल्या 11 नोव्हेंबरला अमिताभ यांचा ‘उंचाई’ हा सिनेमा रिलीज झाला. या चित्रपटात अमिताभ यांच्याशिवाय अनुपम खेर, बोमन इराणी, डेनी डेंजोंगप्पा, सारिका, परिणीती चोप्रा व नीना गुप्ता यांच्या मुख्य भूमिका आहेत. सूरज बडजात्या यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.