Alanna Panday Mehendi : सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? काय आहे नेमकं कनेक्शन?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 10:43 AM2023-03-15T10:43:48+5:302023-03-15T10:46:20+5:30

 Alanna Panday Mehendi : होय, अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल तिची मेहंदी सेरेमनी झाली. मेहंदीचा हा सोहळा सोहेल खानच्या घरी आयोजित करण्यात आला होता.

why ananya pandey cousin alanna panday mehendi held at sohail khan house |  Alanna Panday Mehendi : सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? काय आहे नेमकं कनेक्शन?

 Alanna Panday Mehendi : सोहेल खानच्या घरी का झाली अलाना पांडेची मेहेंदी सेरेमनी? काय आहे नेमकं कनेक्शन?

googlenewsNext

 Alanna Panday Mehendi : काल १४ मार्चला अभिनेता सोहेल खानच्या घरी बॉलिवूड स्टार्सची गर्दी दिसली. अनेक बॉलिवूड स्टार्स सोहेलच्या घरी पोहोचलेत. कारण होतं, मेहंदी सेरेमनीच. होय, अनन्या पांडेची चुलत बहिण अलाना पांडे (Alanna Panday ) लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. काल तिची मेहंदी सेरेमनी झाली. मेहंदीचा हा सोहळा सोहेल खानच्या घरी आयोजित करण्यात आला होता. साहिजकच आता पांडे कुटुंबाच्या लेकीच्या लग्नाचे विधी सोहेल खानच्या (Sohail Khan) घरी का होत आहेत, असा प्रश्नही अनेकांना पडला. तर त्यामागे कारण आहे मैत्री.
होय, अलाना पांडे ही चंकी पांडेचा भाऊ चिक्की पांडेची लेक आहे. चिक्की पांडे आणि सोहेल खान खूपच जवळचे मित्र आहेत, त्यामुळे सोहेलच्या घरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शेवटी जिगरी दोस्तासाठी इतना तो बनता है...

अलाना पांडे तिचा बॉयफ्रेंड आयव्हर मॅक्रेशी लग्नगाठ बांधणार आहे. काल मंगळवारी तिच्या हातावर मेहंदी सजली. या मेहेंदी सेरेमनीसाठी अनेक बॉलिवूड कलाकार आणि पांडे कुटुंब सोहेल खानच्या घरी पोहोचले होते. मेहंदी सोहळ्यात अलानाने  फ्लॉवर प्रिंटचा लेहेंगा घातला होता. तिने होणारा पती मॅक्रेबरोबर कपड्यांचं ट्विनींग केलं होतं. अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपही पोहोचली होती. सलमानची आई सलमा खान, हेलन, अनन्या पांडे, भावना पांडे असे सगळे या सोहळ्याला हजर होते.

चिक्की पांडेची मुलगी अलाना  सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करणा-या अलानाचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. बॉलिवूडमध्ये नसली तरी अलाना ग्लॅमर वर्ल्डचा भाग आहे. शाहरूखची मुलगी सुहाना खान हिच्याशी तिची घट्ट मैत्री आहे. संवेदनशील स्वभावाच्या अलानाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरणं आणि झोपणं प्रचंड आवडतं. अनेकदा ती 14-14 तास झोपते.

Web Title: why ananya pandey cousin alanna panday mehendi held at sohail khan house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.