अनिल कपूर वयाने मोठा असूनही जॅकी श्रॉफ यांना वाकून करतात नमस्कार, हैराण करणार आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 09:44 AM2023-05-27T09:44:52+5:302023-05-27T10:21:27+5:30

नुकत्याच एका मुलाखतीत जॅकी श्रॉफने स्वत: या मागील कारण सांगितलं आहे.

Why anil kapoor touch jackie shroff feet in public you will be shocked to know the reason | अनिल कपूर वयाने मोठा असूनही जॅकी श्रॉफ यांना वाकून करतात नमस्कार, हैराण करणार आहे कारण

अनिल कपूर वयाने मोठा असूनही जॅकी श्रॉफ यांना वाकून करतात नमस्कार, हैराण करणार आहे कारण

googlenewsNext

जॅकी श्रॉफ आणि अनिल कपूर ही जोडी बॉलिवूडमधील सर्वात हिट जोडींपैकी एक आहे. दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. दोघे केवळ चित्रपटांमध्ये नाही तर खऱ्या आयुष्यातही एकमेकांसोबत भावा-भावांप्रमाणे राहतात. जॅकी श्रॉफने अनेक चित्रपटांमध्ये अनिल कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात जॅकी अनिल कपूरपेक्षा लहान आहे. अलीकडेच जॅकी श्रॉफने अनिल कपूरबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत.

Leharen.com ला दिलेल्या मुलाखतीत अनिल कपूरच्या मोठ्या भावाच्या भूमिकेबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ म्हणाला, 'मी कदाचित जाडा आहे आणि तो थोडा बारीक आहे. त्यामुळेच कदाचित मला मोठ्या भावाची भूमिका मिळायची.   हसत हसत जॅकी म्हणाला, तो जेव्हाही मला भेटतो तेव्हा तो माझ्या पाया पडतो जेणेकरून लोकांनाही मी मोठा वाटेन. 

अनिल कपूरबद्दल बोलताना जॅकी श्रॉफ पुढे म्हणाले, 'आमचे एक समीकरण आहे. आम्हाला रोज भेटण्याची आणि हँग आउट करण्याची गरज नाही, परंतु जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा भुतकाळातील आठवणींमध्ये रमतो. जेव्हा पहिल्यांदा आम्ही भेटलो, जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडला, आज जी त्याची पत्नी आहे तिला भेटसाठी नेपेन सीला आला होता. तो म्हणाला होता,  'जग्गू, मला तुझ्यासारखे तयार व्हायचे आहे.' आम्ही थोडा वेळ बोललो. मला त्या वेळा आठवतात, पण जेव्हा आपण भेटतो तेव्हा आग लागतो. आम्ही दोघे भाऊ आग आहोत.

जॅकी श्रॉफने 'राम लखन', 'त्रिमूर्ती', 'रूप की रानी चोरों का राजा' आणि 'परिंदा' यांसारख्या चित्रपटांमध्ये अनिल कपूरच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली आहे.

Web Title: Why anil kapoor touch jackie shroff feet in public you will be shocked to know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.