​का मानतो अनु मलिक बिग बीला प्रेरणा?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2016 12:09 PM2016-12-25T12:09:59+5:302016-12-25T12:09:59+5:30

राष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकार अनु मलिक कोण्या म्युझिक डिरेक्टर अथवा गायकाला प्रेरणा मानत नाही तर अभिनयाचे शहंशाह अमिताभ बच्चन ...

Why Anu Malik is inspired by Big Bila? | ​का मानतो अनु मलिक बिग बीला प्रेरणा?

​का मानतो अनु मलिक बिग बीला प्रेरणा?

googlenewsNext
ष्ट्रीय पुरस्कार विजेता संगीतकार अनु मलिक कोण्या म्युझिक डिरेक्टर अथवा गायकाला प्रेरणा मानत नाही तर अभिनयाचे शहंशाह अमिताभ बच्चन यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी प्रेरणा मानतो.

नुकतेच एका मुलाखतीमध्ये त्याने म्हटले की, आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात इतरांशी दोन हात करायला सतत ऊर्जा ठेवणे सोपे नाही. त्यामुळे आपले स्थान टिकवून ठेवणे खूप कठीण काम आहे. पण मी जेव्हा बच्चन साहेबांकडे पाहतो तेव्हा मला लक्षात येते वयाच्या ७४ व्या वर्षीदेखील ते प्रत्येक चित्रपटासह स्वत:ला रिडिफाईन करीत आहे. काही तरी नवीन करीत आहे. त्यांच्याकडून हे शिकण्यासारखे आहे. ते करू शकतात तर आपण का नाही?’

आयुष्याचा संघर्ष कधीच थांबत नसतो. मग तुम्ही स्ट्रगलर्स असो किंवा सुपरस्टार, प्रत्येकाला धडपड करावीच लागते. तो म्हणतो, ‘आतापर्यंतच्या कारकीर्दीमध्ये अनेकांनी मला नाकारले, मी संपलो म्हणून झिडकारले. पण प्रत्येक वेळी नव्या दम्याने मी पुन्हा उभा राहिलो. काही झाले तरी हार मानायची नाही. यशाने हुरळून जायचे नाही आणि अपयशाने हताश व्हायचे नाही असे मी ठरवले आहे.’

अनु मलिक सध्या दोन चित्रपटांवर काम करीत आहे. मधुर भांडारकरचा ‘इंदू सरकार’ आणि श्रीजीत मुखर्जी दिग्दर्शित ‘बेगम जान’ या दोन सिनेमांना तो संगीत देणार आहे. याबाबत तो म्हणाला की, ‘श्रीजीत जेव्हा महेश भट्टकडे आला होता तेव्हा त्याने आवर्जुन ‘ऐसा लगता हैं’ (रेफ्यिुजी) या गाण्याचा संगीतकारासोबत मला काम करायचे आहे, असे सांगितले होते. एका बंगाली सिनेमाचा हा चित्रपटा रिमेक असून १९४७ मध्ये त्याचे कथानक घडते. मधुरचा चित्रपट १९७५च्या काळातील आहे. यामध्ये माझी मुलगी अनमोल आणि बप्पी लहिरी यांनी एक गाणे गायिले आहे.’

रिअ‍ॅलिटी सिंगिंग शोमधून खरेच टॅलेंट घडते का, असे विचारल्यावर तो म्हणतो, ‘रिअ‍ॅलिटी शोज्ना नाव ठेवण्याची काहीच गरज नाही. मोनाली ठाकूर, अरिजित सिंग हे गायक कुठून आले? मोनालीला तर यंदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.’ ‘दम लगा के हैशा’ चित्रपटातील ‘मोह मोह के धागे’ या गाण्यासाठी मोनालीला बेस्ट गायिकेचा अवॉर्ड मिळाला.

Web Title: Why Anu Malik is inspired by Big Bila?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.