अक्षय कुमारसोबत लग्न का मोडले? रवीना टंडन त्याच्या या कारनाम्यांना वैतागलेली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 02:48 PM2023-01-20T14:48:18+5:302023-01-20T14:57:36+5:30
'मोहरा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना आणि अक्षयची मैत्री खूप वाढली होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसले.
९० च्या दशकातील प्रसिद्ध प्रेमप्रकरणांबद्दल बोलायचे झाले तर अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि रवीना टंडन(Raveena Tandon) ची नावे नक्कीच समोर येतील. सुरुवातीच्या काळात अक्षयचे नाव प्रत्येक हिरोईनसोबत जोडले जात होते. एक काळ असा होता जेव्हा सगळीकडे फक्त रवीना आणि अक्षयच्या प्रेमकथेचीच चर्चा होती. अशी वेळही आली जेव्हा दोघांच्या नात्यात दुरावा येऊ लागला. त्यानंतर रवीनाला तिचे खरे प्रेम अनिल थडानी (Anil Thadani)च्या रूपाने मिळाले.
अक्षय कुमारने ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. अक्षयचे चित्रपट चांगला चालत होते, पण प्रत्येक अभिनेत्रीच्या प्रेमात तो पडतो होता असं बोलले जातं होतं. रवीनाने 1991 मध्ये सलमान खान(Salman Khan) सोबत 'पत्थर के फूल' या चित्रपटातून पदार्पण केले, जो हिट ठरला होता. यानंतर ती 1994 मध्ये अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीसोबत 'मोहरा' (Mohra)चित्रपटात दिसली. हीच वेळ होती जेव्हा दोघे जवळ आले.
'मोहरा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रवीना आणि अक्षयची मैत्री खूप वाढली होती. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. दोघेही पंजाबी कुटुंबातील असल्याने लोकांना वाटू लागले की हे कपल लग्न करणार. दरम्यान, जेव्हा त्यांच्या एंगेजमेंटची बातमी समोर आली तेव्हा सर्वांना खात्री होती की ते बॉलिवूडचे सेलिब्रिटी कपल बनतील. रिपोर्टनुसार एका चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर अक्षय आणि रवीनाने एकमेकांना रिंग घातली होती.
अक्षय त्याच्या प्रत्येक चित्रपटातील हिरोईनसोबत खास नाते निर्माण करत असे आणि त्यामुळे रवीनाला त्रास व्हायचा. 1996 मध्ये आलेल्या 'खिलाडियों का खिलाडी' चित्रपटादरम्यान अक्षय आणि रेखा जवळ आल्याची बातमी समोर आली होती. या गोष्टीचा रवीनाला त्रास झाला पण ती याबद्दल कधीच बोलली नाही. मात्र अक्षयपासून तिचं अंतर वाढत होते. अक्षयचे प्रत्येक मुलीसोबत फ्लर्टिंग आणि रवीनाने त्याला पुन्हा पुन्हा माफ करणे फार काळ टिकू शकले नाही. अखेर रवीनाने अक्षयला तिच्या आयुष्यातून कायमचे काढून टाकण्याचा निर्णय घेतला.
रवीना आणि अक्षयच्या विभक्त झाल्यानंतर रवीनाने अभिनयासोबतच निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवले. यादरम्यान तिची भेट अनिल थडानी यांच्याशी झाली. रवीना आणि अनिल एकमेकांचे चांगले मित्र बनले. 2003 मध्ये अनिलने रवीनाला प्रपोज केले तेव्हा ती 'नाही' म्हणू शकली नाही. यानंतर 22 फेब्रुवारी 2004 रोजी उदयपूरमध्ये दोघांचे ग्रॅण्ड वेडिंग झाले.