का ठरला ‘दंगल’ आमिर खानसाठी सर्वात अवघड चित्रपट?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2016 10:47 AM2016-12-20T10:47:19+5:302016-12-20T10:47:19+5:30
या वर्षाचा शेवट धमाकेदार करण्यासाठी आता ‘दंगल’ चित्रपट आता सज्ज झाला आहे. बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या या बहुप्रतीक्षीत ...
य वर्षाचा शेवट धमाकेदार करण्यासाठी आता ‘दंगल’ चित्रपट आता सज्ज झाला आहे. बॉलीवूडचा मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या या बहुप्रतीक्षीत आणि बहुचर्चित सिनेमाचे ट्रेलर पाहून तर सर्वांचे एकच मत आहे की, असा कारनामा केवळ आमिरच करू शकतो.
कुस्तीपटू महावीर फोगट यांच्या भूमिकेत पूर्णपणे सरमिसळून गेलेल्या आमिरने त्यांचे वयोवृद्ध व तरुणपणातील रुप जीवतोड अंगमेहनत घेऊन कमावले. कुस्तीचे डाव आणि हरयाणवी भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठीदेखील त्याने कष्ट घेतले. या सर्व कारणांमुळे ‘दंगल’ चित्रपट माझ्यासाठी सर्वात अवघड चित्रपट होता, असे तो म्हणतो.
चित्रपटात आमिर अधिकतर वेळ फोगट यांच्या उतारवयातील भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यासाठी त्याला ९०-९५ किलोपर्यंत वजन वाढवावे लागले. एवढ्या वजनामुळे त्याला अनेकदा श्वास घेण्यास त्रास व्हायचा. कुस्ती शिकत असताना तर कित्येक वेळा तो जखमी झाला. पण सर्वात कठीण गोष्ट तर अजून बाकी होती.
अमेझिंग : ९५ किलोवरून ७० किलोपर्यंत असा आला आमिर खान
महावीर यांची तरुणपणातील भूमिका करण्यासाठी आमिरला २५ आठवड्यांत २५ किलो वजन कमी करावे लागले. ही सोपी गोष्ट नव्हती. पण भूमिकेसाठी सर्वस्वी झोकून देण्याची त्याची वृत्तीच आहे. दिग्दर्शक नितीश तिवारीला जसे हवे तसे रुप मिळवण्यासाठी आमिरने अक्षरश: घाम गाळला. म्हणून तर तो सहा महिन्यांच्या आत ७० किलो वजन आणि ९ टक्के कमी चरबी असणारी पीळदार शरीरयष्टी कमवू शकला.
हरयाणवी भाषा शिकण्यासाठी त्याने तेथील लोकांशी चर्चा केली, त्या भाषेतील गाणे ऐकले, शब्दांचे अर्थ व उच्चार समजून घेतले. चित्रपटात कोणतीच उणीव ठेवायची नाही असा त्याने प्रणच केला होता. आता एवढे सगळे करावे लागल्यावर त्याच्यासाठी हा चित्रपट सर्वात अवघड असणारच ना! प्रेक्षकांना तो कितपत भावतो हे येत्या शुक्रवारी प्रदर्शित झाल्यावर कळेलच.