आमिर खानने ३ वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा का घेतला निर्णय?, अभिनेत्याने सांगितले धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 10:34 IST2024-08-26T10:33:46+5:302024-08-26T10:34:24+5:30
Aamir Khan : आमिर खानने तीन वर्षांपूर्वी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्याची मुलं आणि एक्स पत्नी किरण यांची प्रतिक्रिया काय होती? याचा खुलासा त्याने केला आहे.

आमिर खानने ३ वर्षांपूर्वी बॉलिवूडमधून संन्यास घेण्याचा का घेतला निर्णय?, अभिनेत्याने सांगितले धक्कादायक कारण
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) त्याच्या दमदार अभिनयासोबतच त्याच्या खास स्टाइलसाठी ओळखला जातो. आपल्या चित्रपटांसोबतच तो आता पूर्ण वेळ आपल्या कुटुंबाला देत आहे. आमिर शेवटचा लाल सिंग चड्ढा या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. आमिर खानने एकेकाळी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. जेव्हा त्याने घरच्यांना हा प्रकार सांगितला तेव्हा त्याचे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. यादरम्यान एक्स पत्नी किरण रावने आमिरला असे काही सांगितले होते, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला होता.
आमिर खानने रिया चक्रवर्तीच्या पॉडकास्ट चॅप्टर २ मध्ये अनेक खुलासे केले आहेत. तीन वर्षांपूर्वी जेव्हा त्याने अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याच्या कुटुंबाची काय प्रतिक्रिया होती हे त्याने सांगितले. आमिर खान म्हणाला की, तीन वर्षांपूर्वी जेव्हा मी माझ्या मुलांना सांगितले की मी चित्रपट सोडत आहे, तेव्हा ते म्हणाले, पप्पा, तुम्ही चित्रपट कसे सोडू शकता. गेली २० वर्षे तुम्ही वेड्यासारखे यात गुंतला आहात. तुम्ही असे म्हणत आहात कारण तुम्ही यावेळी भावनिक आहात पण तुम्ही हे करू शकणार नाही.
किरण राव म्हणाली...
आमिर म्हणाला की, मुलांना सांगितल्यानंतर मी माझ्या प्रॉडक्शन टीमला फोन केला ज्यामध्ये किरणचा समावेश होता. मी म्हणालो की, मला आता या कंपनीची गरज नाही कारण मी आता चित्रपट बनवणार नाही पण तुम्ही सर्व एकाच व्यवसायात आहात आणि चित्रपट बनवू इच्छित आहात, त्यामुळे तुम्ही ही कंपनी माझ्याकडून घ्या आणि चित्रपट बनवा. त्यावेळी किरण मला म्हणाली की, तू आम्हा सर्वांना सोडून जात आहेस. मी म्हणालो, नाही, मी चित्रपट सोडत आहे आणि तुमच्या सर्वांसोबत जास्त वेळ घालवणार आहे. किरण पुढे म्हणाली, नाही, तुला हे अजून समजले नाही. जर तुम्ही चित्रपट सोडत असाल तर तुम्ही चित्रपटसृष्टीचे मूल आहात. तुम्ही सिनेमासाठी आहात. जर तुम्ही हे सोडत असाल तर तुम्ही तुमचे जीवन आणि जग सोडून देत आहात. आम्हीही या जगाचा एक भाग आहोत, म्हणून तुम्हीही आम्हाला सोडून जात आहात. ती रडत होती. मी म्हणालो की, हे पुन्हा होणार नाही, तू चुकीचं घेत आहेस पण ती बरोबर होती जे मला तेव्हा कळले नाही.
वर्कफ्रंट
आमिर खान लवकरच सितारे जमीन पर या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची कथा डाऊन सिंड्रोमवर आधारित आहे. यंदाच्या ख्रिसमसच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.