अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 12:53 PM2024-11-01T12:53:45+5:302024-11-01T12:54:22+5:30
Amisha Patel : शाहरुख खान आणि राणी मुखर्जीचा 'चलते चलते' हा चित्रपट जवळपास सर्वांनीच पाहिला असेल. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला, पण तुम्हाला माहिती आहे का की अमिषा पटेलला याआधी या चित्रपटाची ऑफर आली होती, पण तिने ती नाकारली होती.
अभिनेते-दिग्दर्शक राकेश रोशन(Rakesh Roshan)च्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अमिषा पटेल (Amisha Patel) रातोरात स्टार बनली. या यशानंतर तिने सनी देओलसोबत गदर हा चित्रपट केला, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. यानंतर तिच्या करिअरमध्ये काही चढ-उतार आले, कारण अभिनेत्रीने काही चित्रपट साइन केले जे प्रेक्षकांना आवडले नाहीत, अमिषा पटेलने नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत खुलासा केला की तिच्या मॅनेजरच्या,चुकीमुळे शाहरुख खानचा चलते चलते चित्रपट हातातून गेला.
अमिषा पटेलने युट्यूब चॅनल BeautybyBiE ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिने एकदा नाकारलेल्या चित्रपटांबद्दल तिला कोणताही पश्चात्ताप नाही. मात्र, अभिनेत्रीने एक खुलासा केला, ती म्हणाली, “माझ्या व्यावसायिक जीवनात मी काही चित्रपट गमावले. काहींना प्रचंड यश मिळाले तर काही फ्लॉप ठरले. मी शाहरुख खानचा 'चलते चलते' केला नाही कारण मला माहित नव्हते की ते मला ऑफर केले गेले आहे. अशा कोणत्याही चित्रपटाची ऑफर आल्याची माहिती माझ्या मॅनेजरने मला दिली नाही. जेव्हा चित्रपट प्रदर्शित होणार होता आणि शाहरुख डबिंग करत होता, तेव्हा त्याने मला डबिंग स्टुडिओत नेले आणि काही फुटेजने दाखवले. तो म्हणाला, 'तू नाकारलेल्या चित्रपटाचे काही फुटेज दाखवतो.' हे ऐकून मला धक्का बसला आणि किंग खानला म्हणाले की, शाहरुख, मी नाकारला? त्यावर शाहरूख म्हणाला 'हो'.
'चलते चलते' बॉक्स ऑफिसवर हिट की फ्लॉप?
चलते चलतेच्या स्टारकास्टबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांनी यात मुख्य भूमिका साकारल्या होत्या. २००३ चा हा रोमँटिक-ड्रामा त्या काळातील सर्वात हिट चित्रपटांपैकी एक ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अझीझ मिर्झा यांनी केले होते. जुही चावला, शाहरुख आणि अझीझ मिर्झा यांच्यासोबत चित्रपट निर्मात्यांनी त्याची सहनिर्मिती केली. त्यात सतीश शाह, लिलेट दुबे, जॉनी लीव्हर असे स्टार्सही होते.
वर्कफ्रंट
अमिषाने बॉलिवूडमध्ये राकेश रोशनच्या म्युझिकल रोमँटिक-थ्रिलर 'कहो ना प्यार है' मधून हृतिक रोशनच्या बरोबरीने दमदार पदार्पण केले. नंतर तिने गदर - एक प्रेम कथा, हमराज, मंगल पांडे: द रायझिंग, हनीमून ट्रॅव्हल्स, भुलैया आणि रेस २ सारखे चित्रपट केले. नंतर २०२३ मध्ये, अभिनेत्री गदर २ मधून मोठ्या पडद्यावर झळकली. तिने सकीनाची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई करून इतिहास रचला.