करिश्मा कपूरने गोविंदासोबत काम करणं का केलं बंद?, अभिनेत्रीनं घेतला होता हा मोठा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 01:39 PM2024-09-23T13:39:28+5:302024-09-23T13:40:14+5:30
Karisma Kapoor And Govinda : करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
करिश्मा कपूर (Karisma Kapoor) आणि गोविंदा (Govinda) ही बॉलिवूडची सर्वात लोकप्रिय जोडी आहे. या दोघांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि चाहत्यांच्या हृदयात खास स्थान निर्माण केले. दोघांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असायचे. त्याने राजा बाबू, कुली नंबर १, हिरो नंबर १ आणि हसीना मान जायेगी सारखे चित्रपट केले आहेत. पण नंतर अचानक त्यांनी एकत्र काम करणे बंद केले. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना धक्का बसला होता.
करिश्मा आणि गोविंदाची जोडी १९९३ ते १९९९ पर्यंत हिट जोडी होती. दोघांनी २००० मध्ये एकत्र काम करणे बंद केले. करिश्माला तिच्या करिअरच्या सुरुवातीला खूप संघर्ष करावा लागल्याच्या बातम्या आल्या होत्या. तिला जी काही भूमिका मिळाली, ती अनुभव घेण्यासाठी करायची. या काळात तिला गोविंदासोबत काम करण्याची संधी मिळाली आणि गोविंदासोबतच्या चित्रपटांनी तिच्या करिअरला नवी ओळख दिली. दोघांनी ११ चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आणि जवळपास सर्वच चित्रपट हिट ठरले.
जेव्हा करिश्माने हा निर्णय घेतला
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, त्यानंतर करिश्माने मसाला चित्रपटांवरून आपले लक्ष हलवण्याचा निर्णय घेतला होता. तिला आमिर, सलमान आणि शाहरुख खानसोबत काम करायचे होते. त्यामुळेच तिने गोविंदासोबत काम करणे बंद केले. १९९६ मध्ये राजा हिंदुस्तानी या चित्रपटात करिश्माला आमिर खानसोबत कास्ट करण्यात आले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. करिश्मा इंडस्ट्रीतील ए-लिस्टर अभिनेत्रींपैकी एक बनली होती. यानंतर करिश्माला अनेक हाय प्रोफाईल प्रोजेक्ट्स मिळू लागले. सलमान खानसोबत जुडवामध्येही तिने काम केले. तर शाहरुख खानसोबत दिल तो पागल हैमध्ये ती झळकली. करिश्मा इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्रींपैकी एक बनली होती.