शिव्या देताना आलियाला काही का वाटलं नाही ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2016 06:10 AM2016-05-12T06:10:13+5:302016-05-12T11:40:13+5:30
तिनं कसलाही मागचा पुढचा विचार न करता शिव्या दिल्यात.. तिचा राग आणि तिचा अंदाजही निराळाच.. तिच्या वाटेला जाणं चांगलंच ...
id=":1i7">
तिनं कसलाही मागचा पुढचा विचार न करता शिव्या दिल्यात.. तिचा राग आणि तिचा अंदाजही निराळाच.. तिच्या वाटेला जाणं चांगलंच महागात पडू शकतं. हे सारं घडतंय आगामी उडता पंजाब या सिनेमात.. याच सिनेमात शिव्या देणारी ती म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री आलिया भट्ट आहे. या सिनेमातली आलियाची भूमिका आजवरील तिनं साकारलेल्या कोणत्याही भूमिकेपेक्षा अनोखी आणि आगळीवेगळी आहे. यांत तिचा अंदाज थोडा गावरान आहे. त्यामुळं या भूमिकेला न्याय देताना भूमिकेची गरज म्हणून आलियानं चक्क शिव्या घातल्यात.. याबद्दल विचारलं असता ती म्हणते भूमिकेची गरज म्हणून काहीही करण्यासाठी मी तयार असते. मग ते डान्स असो, रडणं असो, उड्या मारणं असो किंवा मग शिव्या देणं. त्यामुळं प्रत्यक्ष जीवनात जरी मी तशी नसली तरी स्क्रीप्टची गरज म्हणून शिव्या दिल्याचं आलियानं म्हटलंय.