का वेगळे झाले सलीम-जावेद? 'अँग्री यंग मॅन'मधून इतक्या वर्षांनी जावेद अख्तर यांनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 12:45 PM2024-08-20T12:45:12+5:302024-08-20T12:45:40+5:30

लोकप्रिय सिनेमे लिहिले तरीही का वेगळे झाले सलीम - जावेद? अंग्री यंग मॅन वेबसीरिजमधून उलगडा झालाच (angry young men)

Why did Salim-Javed get separated? Javed Akhtar revealed after in Angry Young Men webseries | का वेगळे झाले सलीम-जावेद? 'अँग्री यंग मॅन'मधून इतक्या वर्षांनी जावेद अख्तर यांनी केला खुलासा

का वेगळे झाले सलीम-जावेद? 'अँग्री यंग मॅन'मधून इतक्या वर्षांनी जावेद अख्तर यांनी केला खुलासा

सलीम खान-जावेद अख्तर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी. आजवर आपण बॉलिवूडमध्ये अनेक संगीतकरांच्या जोड्या,  अभिनेत्यांच्या जोड्या लोकप्रिय होताना बघितल्या. पण सलीम-जावेद ही अशी जोडी आहे जी लेखक म्हणून लोकप्रिय झाली. आजही सलीम-जावेद यांनी लिहिलेले सिनेमे नवोदित लेखकांसाठी एक वस्तुपाठ आहेत. या दोघांच्या जोडीवर 'अँग्री यंग मॅन' ही वेबसीरिज आलीय. यामध्ये ही लोकप्रिय जोडी नंतर वेगळी का झाली? याचा उलगडा झालाय. 

सलीम-जावेद का वेगळे झाले? जावेद अख्तर म्हणतात...

जावेद अख्तर या वेबसीरिजमध्ये म्हणाले की, एक दिवस ते सलीम खान यांच्याजवळ गेले. पुढे त्यांनी पार्टनरशिपमधून पुढे जाण्याचा विचार सांगितला. दोघांच्या कामात काहीसा थकवा आला होता. त्यामुळे दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. जावेद अख्तर म्हणतात, "आम्ही १८ तास एकत्र असायचो. परंतु पुढे आमचे नवीन मित्र झाले आणि आमचं भेटणं कमी होऊ लागलं. हे सुद्धा एक कारण होतं. पण हे इतकं मोठं कारण नव्हतं. माझ्या मते आमच्या करिअरमध्ये एक कोरडेपणा आला होता. कामात एक प्रकारचा थकवा आला होता."


जावेद अख्तर पुढे म्हणाले, "पुढे आम्ही वेगळे झालो. पण अत्यंत सभ्यपणे आम्ही आमचे मार्ग बदलले. आम्ही याविषयी कधीही जाहीर भाष्य केलं नाही. ते काहीतरी वेगळं बोलतील. मी काहीतरी वेगळी बाजू मांडेन. अनेकदा अशावेळी लोक एकमेकांवर चिखलफेक करतात आणि वाईटसाईट बोलतात. त्यामुळे आजही आम्ही आमच्या चांगल्या दिवसांबद्दल बोलतो." जोडी तुटल्यावर सलीम खान खूप काळजीत होते. तर जावेद अख्तर यांनी त्यांची पहिली पत्नी हनी ईरानीला याविषयी काहीही प्रश्न विचारु नयेत म्हणून सांगितलं.

Web Title: Why did Salim-Javed get separated? Javed Akhtar revealed after in Angry Young Men webseries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.