Vikrant Masseyने का घेतला अभिनयातून संन्यास? अखेर कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 11:25 AM2024-12-03T11:25:13+5:302024-12-03T11:25:57+5:30
Vikrant Massey: विक्रांत मेस्सीने सोमवारी अभिनयातून निवृत्तीची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला आहे. आता अभिनेत्याच्या या निर्णयाचे खरे कारण समोर आले आहे.
'द साबरमती रिपोर्ट' फेम अभिनेता विक्रांत मेस्सी(Vikrant Massey)ने नुकतेच इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून अभिनयातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा करून सर्वांना चकित केले आहे. या धक्कादायक निर्णयानंतर, अभिनेत्याने करिअरच्या शिखरावर असताना असा निर्णय का घेतला हे सर्वांना जाणून घ्यायचे आहे. अभिनेत्याने अचानक घेतलेल्या निर्णयाचे कारण सांगितले नसले तरी त्याच्यासोबत काम केलेल्या एका दिग्दर्शकाने विक्रांतच्या निवृत्तीमागील संभाव्य कारण उघड केले आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, एका दिग्दर्शकाने त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, “विक्रांतला स्वतःला जास्त पसरायचे नाही. त्याला ओटीटी आणि चित्रपटांच्या ऑफर्सचा पूर आला आहे. त्याला भीती अशी आहे की तो स्वत:ला ओव्हर एक्सपोज करत आहे आणि प्रेक्षक लवकरच त्याला कंटाळतील. त्यामुळे विश्रांती घेणे आणि स्वतःला थोडा वेळ देणे हा एक धाडसी निर्णय आहे...का नाही?"
विक्रांतच्या निवृत्तीच्या घोषणेचा 'डॉन ३'शी संबंध?
इंडस्ट्रीतील दुसऱ्या सूत्राने आउटलेटला सांगितले की त्याचे हे पाऊल स्वतःला बळकट करण्यासाठी देखील एक धोरण असू शकते. रिपोर्ट्सनुसार, सूत्राने सांगितले की, “एक्सेल एंटरटेनमेंटद्वारे निर्मित पुढील डॉनमध्ये तो नकारात्मक भूमिका साकारण्याची शक्यता आहे. मला आश्चर्य वाटणार नाही की हा ब्रेक स्वतःला नवीन रूपात आणण्याचा आणि पुन्हा लाँच करण्याचा मार्ग असेल. तो नेहमीच एक विचारशील अभिनेता आहे. त्यामुळे या ब्रेकचा डॉन ३ शी काही संबंध असू शकतो."
विक्रांत मेस्सीने पोस्टवर केली निवृत्तीची घोषणा
विक्रांत मेस्सीने इन्स्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा केली. अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, नमस्कार, गेली काही वर्षे आणि त्यानंतरची वर्षे आश्चर्यकारक होती. तुमच्या अतुलनीय पाठिंब्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आभार मानतो. पण जसजसा मी पुढे सरकतोय तसतसे मला वाटते की आता घरी जाण्याची वेळ आली आहे. पती, वडील आणि मुलगा म्हणून आणि अभिनेता म्हणूनही. त्यामुळे येत्या २०२५ मध्ये आम्ही एकमेकांना शेवटची भेट घेणार आहोत. जोपर्यंत वेळ योग्य वाटत नाही. शेवटचे २ चित्रपट आणि अनेक वर्षांच्या आठवणी. पुन्हा धन्यवाद, प्रत्येक गोष्टीसाठी नेहमीच ऋणी राहीन.
विक्रांतचा साबरमती रिपोर्ट नुकताच प्रदर्शित झाला आहे. पीएम मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक नेत्यांनी या चित्रपटाचे कौतुक केले आहे. विक्रांतचे अनेक प्रोजेक्ट पाइपलाइनमध्ये आहेत.