ऐश्वर्या व अभिषेक बच्चन रेखा यांना का संबोधतात 'आई'?, हे आहे यामागचं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:33 PM2020-06-11T19:33:32+5:302020-06-11T19:34:09+5:30

अभिनेत्री रेखा यांना अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन आई अशी हाक मारतात. रेखादेखील त्यांचे खूप लाड करताना दिसतात.

Why do Aishwarya and Abhishek Bachchan call Rekha 'Mother'? This is the reason behind it | ऐश्वर्या व अभिषेक बच्चन रेखा यांना का संबोधतात 'आई'?, हे आहे यामागचं कारण

ऐश्वर्या व अभिषेक बच्चन रेखा यांना का संबोधतात 'आई'?, हे आहे यामागचं कारण

googlenewsNext

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेत्री रेखा यांच्या प्रेमाच्या चर्चा बऱ्याचदा होत असतात. एक असा वेळ होता त्यावेळी ते दोघेही अफेयरच्या वृत्तामुळे चर्चेत असायचे. बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या रायचे रेखा खूप लाड करतात. जेव्हा ते भेटतात त्यावेळी रेखा खूप काळजी घेते व प्रेम करते. त्यामुळे ते भेटल्यानंतर पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण येते. 

रेखा यांनी कित्येकदा बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या रायबद्दल बोलल्या आहेत आणि रेखा यांचे अभिषेक बच्चनवरदेखील खूप प्रेम आहे. इतकंच नाही तर ऐश्वर्या व अभिषेकदेखील रेखा यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांना आई असे संबोधतात. 

सूत्रांच्या माहितीनुसार, अभिषेक बच्चन व ऐश्वर्या यांचे भूतकाळाशी काहीच देणं घेणं नाही. त्यामुळे त्यांच्या मनात रेखा यांच्याबद्दल अजिबात वाईट भावना नाही. त्या दोघांच्या मनात रेखा यांच्या प्रती प्रेम, आदर व सन्मान आहे. रेखा देखील त्या दोघांवर आईप्रमाणे प्रेम व लाड करतात आणि तेदेखील रेखा यांच्याशी तसेच वर्तणूक करतात. 

एका इव्हेंटमध्ये ऐश्वर्याला रेखा यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला होता. त्यावेळी त्या दोघांचे एकमेकांशी वर्तणूक पाहून हा पुरस्कार सोहळा खूप चर्चेत आला होता. रेखा ऐश्वर्यासोबत अशा वागत होत्या जणू काही ती त्यांची सून आहे.

रेखा यांनी कधीच बच्चन कुटुंबाच्या विरोधात काहीच म्हटलं नाही. त्या नेहमीच अमिताभ बच्चन यांच्याप्रती असलेले प्रेम अप्रत्यक्षरित्या व्यक्त करत असतात. रेखा यांनी 1984 साली दिलेल्या एका मुलाखतीत जया बच्चन यांच्यावर निशाणा साधला होता. त्या म्हणाल्या होत्या की, मला काय सांगायचं आहे, त्याने काहीच फरक पडत नाही. मी दुसरी स्त्री आहे ना. आई वडिलांना मुलीच्या अफेयरमुळे लाज वाटते पण त्याच आई वडिलांना मुलाच्या अफेयरवर लाज वाटत नाही. कारण हा इमेजचा प्रश्न असतो ना. कुणाला आतली गोष्ट माहित नसते. कारण समोरची पार्टी खूप उत्तमरित्या बिचारी बनते. कारण हेच योग्य आहे. मी फक्त फ्री आहे. कारण दुसरा व्यक्ती असं करू शकत नाही, त्याला सोडू शकत नाही.

Web Title: Why do Aishwarya and Abhishek Bachchan call Rekha 'Mother'? This is the reason behind it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.