​-म्हणून विद्याला नाही फिकीर!!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2016 03:44 PM2016-11-27T15:44:08+5:302016-11-27T15:44:08+5:30

अभिनेत्री विद्या बालन हिचा  ‘कहानी2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय.  २०१२ मध्ये विद्याचा ‘कहानी’ आला होता. हा चित्रपट चांगलाच ...

-Why do not you forget the school! | ​-म्हणून विद्याला नाही फिकीर!!

​-म्हणून विद्याला नाही फिकीर!!

googlenewsNext
िनेत्री विद्या बालन हिचा  ‘कहानी2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय.  २०१२ मध्ये विद्याचा ‘कहानी’ आला होता. हा चित्रपट चांगलाच हिट ठरला होता. आता ‘कहानी2’कडूनही लोकांना ब-याच अपेक्षा आहेत. अर्थात केवळ प्रेक्षकच नाही तर विद्यालाही या चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा आहे. अशावेळी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरणार की नाही, याचा दबाव असणारच. पण विद्याचे म्हणाल तर ती बिनधास्त आहे. ‘कहानी2’बद्दल मी जराही दबावात नाही, असे विद्याने अलीकडे स्पष्ट केले. केवळ एवढेच नाही तर यामागचे कारणही सांगितले. 
‘कहानी’ हिट झाला. अशास्थितीत ‘कहानी2’ रिलीज होत असताना काही प्रेशर जाणवते का? असा प्रश्न विद्याला अलीकडे एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर अजिबात नाही, असे उत्तर विद्याने दिले. खरे तर ‘कहानी2’ हा ‘कहानी’चा सीक्वल नाहीच. त्यामुळे माझे अर्धे प्रेशर तसेही गेलेच. ‘कहानी’नंतर लगेच ‘कहानी2’ आला असता तर कदाचित मला अधिक प्रेशर जाणवले असते आणि तसेही ‘कहानी’नंतर माझा एकही चित्रपट चालला नाही. त्यामुळे मी अजिबात टेन्शनमध्ये नाही, असे विद्या म्हणालीआणि खो-खो हसत सुटली. बॉलिवूडचा कुठलाही सेलिब्रिटी त्याच्या फ्लॉप चित्रपटांविषयी बोलणे टाळतो. पण विद्याने मात्र तिच्या फ्लॉप चित्रपटांविषयी बोलण्याचे धाडस दाखवले. शेवटी हेही नसे थोडके.
२०१२ मध्ये विद्याचा ‘कहानी’ आला. हा चित्रपट हिट झाला. समीक्षकांनीही या चित्रपटाला दाद दिली. पण त्यानंतर आलेले विद्याचे सर्व चित्रपट बॉक्स आॅफिसवर आपटले. ‘घनचक्कर’,‘शादी के साईड इफेक्ट’,‘बॉबी जासूस’,‘हमारी अधूरी कहानी’ आणि ‘तीन’या विद्याच्या सगळ्याच्या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. आता ‘कहानी2’ हिट व्हावा, इतकीच काय अपेक्षा!


Web Title: -Why do not you forget the school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.