जया बच्चन को गुस्सा क्यों आता है? वाचा, त्यांचे ‘अँग्री’ किस्से!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2017 10:18 AM2017-08-29T10:18:14+5:302017-08-30T11:06:39+5:30
महानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन त्यांच्या परखड स्वभावासाठी खास ओळखल्या जातात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जयांचा संताप आपण ...
म ानायक अमिताभ बच्चन यांची पत्नी जया बच्चन त्यांच्या परखड स्वभावासाठी खास ओळखल्या जातात. अनेकदा सार्वजनिक ठिकाणी जयांचा संताप आपण बघितला आहे. गेल्या आठवडाभरात असे दोनदा झाले. होय,अलीकडे हेमामालिनीची मुलगी इशा देओल हिच्या डोहाळ जेवणावेळी जयांचा हाच ‘अँग्री’ अवतार पाहायला मिळाला होता. यानंतर काल-परवा पुन्हा असेच घडले. जया बच्चन गणपती बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गेल्या होत्या. या ठिकाणी काही चाहत्याने त्यांच्यासोबत सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला आणि हे पाहून जया संतापल्या. ‘डोन्ट डू दिस, स्टुपिड,’ अशा शब्दांत त्यांनी त्या चाहत्याला सुनावले. केवळ इतकेच नाही तर दहा सेकंद त्या चाहत्याकडे त्या संतापाने बघत राहिल्या. यानंतर पु्न्हा एकदा त्याला ‘स्टुपिड’ म्हणत कारमध्ये बसल्या. सध्या जया बच्चनचा हा अँग्री अवतार दाखवणारा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे.
यापूर्वीही जया बच्चन अशाच भडकल्या आहेत. जया बच्चन यांना कुठल्या प्रसंगी आणि का राग आला, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत....
भटजींना सुनावली खरी-खोटी
अलीकडे हेमा मालिनी यांची मुलगी इशा देओल हिच्या डोहाळ जेवणावेळीही जयांचा हाच संताप अनावर झाला होता. इशा देओलचे काही जवळचे मित्र आणि हेमा मालिनीचे काही मित्र या सोहळ्याला हजर होते. यात जया बच्चन यांचाही समावेश होता. या कार्यक्रमात सगळे काही रिती-रिवाजाप्रमाणे व्हावे, यावर जया बच्चन जातीने लक्ष ठेवून होत्या. पण असे होत नाही असे दिसल्यावर त्यांचा पारा चढला. विधी करण्यासाठी याठिकाणी भटजींची टीम हजर होती. पण ही भटजींच्या टीममधील एकाचा इशा देओलसोबत सेल्फी घेण्याचा खटाटोप सुरु होता. जया बच्चनला हे दिसले आणि त्यांनी सेल्फी घेणाºया त्या भटजींना चांगलेच खडसावले. आधी पूजेवर लक्ष द्या मग सेल्फी घ्या, असे त्यांनी त्याला सुनावले. मग काय, जया बच्चनचे हे वाक्य ऐकून भटजींची सगळीच टीम चांगलीच वरमली. याऊलट उपस्थितांमध्ये सगळीकडे खसखस पिकली.
कॉलेज स्टुडंटला शिकवले मॅनर्स
एकदा मुंबईच्या एका कॉलेजात जया बच्चन यांचा पारा चढला होता. या कॉलेजच्या एका कार्यक्रमात जया मुख्य अतिथी म्हणून हजर होत्या. याचदरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्यांचे फोटो घेणे सुुरू केले. मग काय, जया बच्चन चांगल्याच संतापल्या. आधी ते मोबाईल बंद करा. मला हे सगळे अजिबात आवडत नाही. त्या कॅमेºयांचा लाईट माझ्या डोळ्यांवर पडतोय. काही सामान्य मॅनर्स आहेत. आपल्या भारतीयांनी ते शिकायला हवे. तुमच्याजवळ कॅमेरा मोबाईल आहे म्हणून कुठल्याक्षणी, कुणाचेही विनापरवानगी फोटो काढण्याचा अधिकार तुम्हाला मिळतो का? असे त्यांनी सर्वांना सुनावले होते.
संसदेतही घेतला क्लास
समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांनी एकदा संसदेत मंत्र्यांचाही क्लास घेतला होता.एका चर्चेदरम्यान सुशील कुमार शिंदे यांच्या एका टिप्पनीने जया यांचे माथे भडकले होते. यावर शिंदे यांनी जया बच्चन यांना मध्येच टोकत, ‘मॅडम, जरा लक्षपूर्वक ऐका. हा कुठला फिल्मी मुद्दा नाही,’ असे म्हटले होते. शिंदेचा टोमणा ऐकून तर जया बच्चनचा तिळपापड झाला होता. यावर त्यांनी तीव्र आक्षेप नोंदवला होता. अखेर शिंदे यांना माफी मागावी लागली होती.
फोटोग्राफर्सलाही सहन करावा लागलाय संताप
एका इव्हेंटमध्ये मीडियाच्या कर्मचाºयांनी ऐश्वर्या राय बच्चनला ‘ऐश्वर्या’ अशा एकेरी नावाने संबोधले. ऐश्वर्याच्या सासूबाई अर्थात जया बच्चन त्यावेळी तिथेच होत्या. पत्रकार ऐश्वर्याला असे एकेरी बोलतोय पाहून त्या संतापल्या. ऐश्वर्या तुझ्याऐवढी आहे का? असा सवाल करीत त्यांनी त्या पत्रकाराला धारेवर धरले होते.
अप्रत्यक्षपणे सुनेवरही काढला राग
अलीकडे मामी(टअटक) चित्रपट महोत्सवात जया यांनी चित्रपटांवर नाराजी व्यक्त केली होती. आजचे चित्रपट फक्त पैशांसाठी बनवले जातात. सगळे काही तुमच्या चेहºयावर फेकले जाते. प्यार आणि भावनांचा बाजार मांडला जातो. लाज लज्जा तर उरलीच नाही, असे त्या म्हणाल्या होत्या. त्यांचा हा राग ऐश्वर्यावर होता, असे त्यावेळी मानले गेले होते. कारण ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटात ऐश्वर्याने अतिशय बोल्ड सीन्स दिले होते. यामुळे जया बच्चन नाराज होत्या, असे मानले गेले होते.
महिला सुरक्षेच्या मुद्यावरही चढला होता पारा
महिला सुरक्षेच्या मुद्यावरही जया बच्चन अशाच संतापल्या होत्या. भाजप युवा मोर्चाच्या एका नेत्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे शिर कापून आणणाºयास ११ लाख रूपयांचे बक्षिस जाहिर केले होते. नेत्याच्या या वादग्रस्त बयानावर जया बच्चन प्रचंड भडकल्या होत्या. संसदेत त्यांनी हा राग बोलून दाखवला होता. या देशातील नेते गायींना वाचण्याची भाषा करतात. मग ते देशातील एका महिलेबद्दल असे कसे बोलू शकतात. गायींना वाचवण्याआधी,महिलांना वाचवा. एका महिला मुख्यमंत्र्यांचे शिर कापूर आणण्याची भाषा तुम्ही करू शकताच कशी? असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला होता.