कंगना राणौत आयटम नंबर्स का करत नाही?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2018 07:42 AM2018-04-04T07:42:13+5:302018-04-04T13:12:13+5:30
अभिनेत्री कंगना राणौत कितीही परखड असली तरी तत्त्वांची पक्की आहे, असे मानायला हरकत नाही. होय, आपल्या करिअरमध्ये कंगनाने अनेक ...
अ िनेत्री कंगना राणौत कितीही परखड असली तरी तत्त्वांची पक्की आहे, असे मानायला हरकत नाही. होय, आपल्या करिअरमध्ये कंगनाने अनेक वाद ओढवून घेतलेत, अनेकांची टीका, संताप ओढवून घेतला. पण म्हणून तत्त्वांशी फारकत मात्र घेतली नाही. आता आम्ही हे कशावरून बोलतोय, तर कंगना आयटम नंबर्स का करत नाही? या प्रश्नाच्या संदर्भावरून. होय, कंगना आयटम नंबर्स का करत नाही, असा प्रश्न अलीकडे कंगनाला विचारण्यात आला. यावर कंगनाने अगदी बेधडक आणि नेहमीप्रमाणेच रोखटोक उत्तर दिले. आयटम नंबर्समध्ये करण्यासारखे काहीच नसते. त्यात असते ती केवळ अश्लिलता. म्हणून मी ते करत नाही, असे कंगना म्हणाली. जे माझ्या समाजासाठी, या समाजातील लहान मुलांसाठी घातक आहे, असे काहीही मी करणार नाही. उद्या माझी मुलगी किंवा तुमची मुलगी मोठी होईल तेव्हा तिच्याकडून आपण याचीच अपेक्षा करू का? असा सवालही तिने केला. जग ज्याच्या मागे धावतं ते करण्यात मला मुळीच रस नाही. मला ज्यातून आनंद मिळतो, तेच मी केले आणि पुढेही तेच करत राहील. हेच कारण आहे की, मी कुठल्याही फेअरनेस क्रिमची जाहिरात करत नाही, मोठ्या हिरोंचे चित्रपट करत नाही आणि आयटम नंबरर्सही करत नाही, असेही ती म्हणाली.
ALSO READ : कंगना राणौत राजकारणात यायला तयार, पण....!!
सध्या कंगना आपल्या मनालीतील नव्या बंगल्यात काही निवांत क्षण घालवत आहे. या घरातील सध्याचा तिचा दिनक्रम कसा आहे, हेही तिने सांगितले. ती म्हणाली, मी पहाटे पाच वाजता उठून वॉकला जाते. येथे मला पाहून गर्दी जमा होत नाही. मी निवांत वेळ घालवते. पियानो शिकते आणि रात्री आकाशातील तारे पाहत शांत झोपते. या घरात मेडिटेशन करणे खूप सोपे आहे. कारण येथील कंपने खूप सात्विक आहेत. या घरावर माझे प्रेम आहे. अर्थात मुंबईवरही माझे प्रेम आहे. कारण ही ती जागा आहे, जिथे मी केवळ १५०० रूपये घेऊन आले होती. या शहराने मला सगळे काही दिले.