"म्हणून शुक्रवार महत्त्वाचा!", असं का म्हणतोय अभिषेक बच्चन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 15:41 IST2023-08-12T15:41:02+5:302023-08-12T15:41:15+5:30
Abhishek Bachchan : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

"म्हणून शुक्रवार महत्त्वाचा!", असं का म्हणतोय अभिषेक बच्चन?
आर बाल्कीचा आगामी चित्रपट घूमर आकर्षक कथा त्यांच्या दूरदर्शी दिग्दर्शनामुळे हा चित्रपट नक्कीच काहीतरी अनोखा असणार आहे यात शंका नाही. अभिषेक बच्चनसाठी हा चित्रपट वेगळा ठरणार असून तो यात एक लक्षणीय भूमिका साकारणार असल्याचं कळतंय. ही भूमिका नक्कीच त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरणार आहे. त्याचे अभिनय कौशल्य यातून बघायला मिळणार आहे. हे पात्र भावनिक आणि प्रेरक प्रवासाचा अनोखा नमुना असणार आहे.
अभिषेक बच्चनच्या कारकिर्दीत अनेक उत्तोत्तम चित्रपट आहेत. उल्लेखनीय कामामध्ये युवामधील लल्लन सिंग, गुरुमधील दृढ उद्योजक गुरुकांत देसाई आणि सरकारमधील शंकर नागरे यांच्या संयमी तरीही सशक्त अभिनयाचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, त्याची विनोदी भूमिका असलेला बंटी और बबलीदेखील आहे.
कलाकारासाठी मेक किंवा ब्रेक चित्रपट असतो
अभिषेक बच्चनला ट्रेलर लाँचला विचारण्यात आले की, घूमर त्याच्यासाठी गेम चेंजर ठरेल का ? तेव्हा अभिषेक बच्चनने उत्तर दिले आणि म्हणाला की,"प्रत्येक अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता आणि चित्रपटाशी संबंधित असलेल्या सर्वांसाठी शुक्रवार प्रत्येकाचे भविष्य ठरवतो. प्रत्येक चित्रपट हा मेक किंवा ब्रेक चित्रपट असतो. प्रेक्षक तुमच्यावर प्रेम करतात आणि प्रेक्षकांना तुम्हाला आणखी बघायचे आहे का हे शुक्रवार ठरवेल. प्रत्येक चित्रपट हा चित्रपटाशी संबंधित असलेल्या प्रत्येक कलाकारासाठी मेक किंवा ब्रेक चित्रपट असतो. घूमर वेगळा नाही कारण तो सारखाच आहे.”
१८ ऑगस्टला घूमर येणार भेटीला
"घूमर" मध्ये अभिषेक बच्चन, संयमी खेर, शबाना आझमी आणि अंगद बेदी हे कलाकार आहेत. आर बाल्की दिग्दर्शित, हा चित्रपट होप प्रॉडक्शन आणि सरस्वती एंटरटेनमेंट यांच्यातील सहयोगी प्रयत्न आहे. १८ ऑगस्ट २०२३ रोजी घूमर रिलीज होणार आहे.