साऊथ फिल्म इंडस्ट्रीसमोर का मार खातंय बॉलिवूड? SBIच्या संशोधनात 'ही' कारणे आली समोर...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 03:11 PM2022-08-29T15:11:21+5:302022-08-29T15:12:39+5:30

गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी हिंदी चित्रपटसृष्टी आज अतिशय खराब परिस्थितीतून जात आहे.

Why is Bollywood failing in front of the South film industry? SBI's research revealed '4' reasons... | साऊथ फिल्म इंडस्ट्रीसमोर का मार खातंय बॉलिवूड? SBIच्या संशोधनात 'ही' कारणे आली समोर...

साऊथ फिल्म इंडस्ट्रीसमोर का मार खातंय बॉलिवूड? SBIच्या संशोधनात 'ही' कारणे आली समोर...

googlenewsNext

OTT Vs Bollywood: गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी हिंदी चित्रपटसृष्टी आज अतिशय खराब परिस्थितीतून जात आहे. या संकटामुळे बॉलिवूडमधील दिग्गज निर्मातेही हादरले आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या संशोधन टीमने याबाबत अभ्यास केला असून, दाक्षिणात्य चित्रपट आणि बॉलिवूडमधील फरक समोर आणला आहे. 

मुख्य आर्थिक सल्लागार सौम्या कांती घोष यांनी या विषयावर अभ्यास केला आहे. Reminiscing the days of friday blockbuster Bollywood Releases: Are we witnessing a behavioural shift in viewers pshyche of a new India? नावाच्या रिपोर्टमध्ये 4 अशा मुद्द्यांना अधोरेखित केले आहे, ज्यामुळे बॉलिवूडला सध्या वाईट दिवसांचा सामना करावा लाग आहे.

कोविडमुळे चित्रपटगृहे बंद होती
रिपोर्टनुसार, कोरोना काळात सर्वकाही बंद होते, यात सिनेमेही बंद झाले. महामारीपूर्वी हिंदी भाषेत 70-80 चित्रपट दरवर्षी प्रदर्शित होत होते आणि त्यातून 3000-5000 कोटींची कमाई व्हायची. पण जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2022 पर्यंत हिंदी भाषेत (मूळ + दक्षिण/इंग्रजी ते हिंदी डब केलेले चित्रपट) 61 चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यांच्याकडून एकूण कमाई 3200 कोटी रुपये झाली. यातील 48% डब केलेल्या चित्रपटांमधून आले आहेत. मूळ हिंदी चित्रपटांची परिस्थिती असमाधानकारक आहे, असे अहवालात म्हटले आहे. जानेवारी 2021 पासून 43 हिंदी चित्रपटांचे सरासरी रेटिंग 5.9 आहे, तर हिंदीत डब केलेल्या 18 चित्रपटांचे रेटिंग 7.3 आहे.

दक्षिण भारतात अधिक सिंगल स्क्रीन थिएटर्स
रिपोर्टनुसार, मल्टिप्लेक्समधील तिकिटे सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या तीन ते चार पट जास्त महाग असतात. आधीच महाग तिकीट आणि त्यावर करमणूक कर आकारला जातो. विशेष म्हणजे, 62 टक्के सिंगल स्क्रीन थिएटर दक्षिण भारतात आहेत, तर उत्तर भारतात 16 टक्के आहे आणि पश्चिम भारतात त्यांची संख्या 10 टक्के आहे. सिंगल स्क्रीन थिएटर्सची घट आणि एकाच वेळी मल्टिप्लेक्सची संख्या वाढल्यामुळे हिंदी चित्रपट उद्योगाला समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे संशोधनात म्हटले आहे.

ओटीटीवर थेट रिलीज...
याशिवाय, ऑनलाइन प्लॅटफॉर्मने अॅक्शन, हॉरर, ड्रामा, थ्रिलर आणि कॉमेडी यासारखे विविध प्रकारचे चित्रपट आणण्यास सुरुवात केल्यामुळे विविध राज्यांमधील चित्रपटसृष्टीवर परिणाम पडत आहे. तरुण आता बहुतांश ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर आहेत आणि त्यांच्या आवडीचे चित्रपट पाहतात. ओटीटीच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. OTT चा वाटा 7 ते 9 टक्के असून, तो सतत वाढत आहे. सध्या विविध भाषांमध्ये 40 ओटीटी प्लॅटफॉर्म आहेत, जे ओरिजनल कंटेंट देत आहेत. रिपोर्ट्सनुसार, भारतात 45 कोटी ओटीटी सब्सक्रायबर्स आहेत आणि 2023 पर्यंत हा आकडा 50 कोटींच्या घरात जाईल. 

Web Title: Why is Bollywood failing in front of the South film industry? SBI's research revealed '4' reasons...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.