"गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 10:28 IST2025-01-30T10:24:54+5:302025-01-30T10:28:23+5:30

Kangana Ranaut on Monalisa : महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दरम्यान आता व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सौंदर्याचे बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे.

"Why is fair skin preferred?", Kangana Ranaut was impressed by viral girl Monalisa's dark skin | "गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा

"गोऱ्या रंगाला का मिळते पसंती?", कंगना राणौत व्हायरल गर्ल मोनालिसाच्या सावळ्या रंगावर झाली फिदा

महाकुंभ मेळ्यात माळा विकण्यासाठी आलेल्या इंदूरमधील तरुणी सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली. दरम्यान आता व्हायरल गर्ल मोनालिसा(Viral Girl Monalisa)च्या सौंदर्याचे बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत(Kangana Ranaut)ने कौतुक करत तिला पाठिंबा दिला आहे. कंगनाने हे देखील म्हटले की, इंडस्ट्रीतील लोक गोरी त्वचेकडे अनावश्यकपणे आकर्षित होतात तर आपल्याकडे दीपिका पादुकोण, काजोल, बिपाशा बासू सारख्या सुंदर सावळ्या रंगाच्या अभिनेत्री आहेत. कंगना म्हणाली की, आजकाल लोक गोरे होण्यासाठी अनेक उपचार करू लागले आहेत.

कंगना राणौत नेहमीच विविध प्लॅटफॉर्मवर महिला सक्षमीकरणाचा प्रचार करत असते. तिला अनेकदा महिलांच्या समस्यांवर बोलताना देखील पाहिले गेले आहे ज्यामध्ये ती इंडस्ट्रीमध्ये महिलांना भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल बोलते. आता कंगनाने ग्लॅमरच्या दुनियेत गोऱ्या रंगाला मिळणाऱ्या पसंतीबद्दल बोलली आहे. तिने महाकुंभमध्ये व्हायरल होत असलेल्या मोनालिसाचा फोटो देखील शेअर केला आहे.  जिने तिच्या सुंदर डोळ्यांनी अनेकांना आकर्षित केले. मोनालिसा आता इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. कंगनाने तिच्या सौंदर्याचे कौतुक केले आणि ग्लॅमरच्या दुनियेत महिलांना त्यांच्या त्वचेच्या रंगावरून कसा न्याय दिला जातो याबद्दलही सांगितले.

लोकांना इंडस्ट्रीत सावळा रंग आवडत नाही
कंगनाने इंस्टाग्राम स्टोरीमध्ये मोनालिसाचा फोटो शेअर करत लिहिले की, "ही तरुण मुलगी मोनालिसा तिच्या नैसर्गिक सौंदर्यामुळे इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. मला अशा लोकांचा तिरस्कार आहे जे तिला फोटो आणि मुलाखतींसाठी त्रास देत आहेत. ग्लॅमर जगतात आपल्याकडे सावळ्या रंगवाली सुंदरता आहे, हा विचार करण्यापासून मी स्वत:ला थांबवू शकत नाही. अनु अग्रवाल, काजोल, बिपाशा बसू, दीपिका आणि राणी मुखर्जी यांच्यासारख्या तरुण अभिनेत्रींना लोक पसंती देतात का?

कित्येकांनी गोऱ्या रंगासाठी केली ट्रिटमेंट
आता सगळ्याच अभिनेत्री इतक्या गोरी का दिसू लागल्या आहेत? जे तारुण्यात सावळ्या रंगाच्या होत्या. लोक जसे मोनालिसाला पसंत करत आहेत, तसे त्यांना सावळ्या रंगाच्या तरुण अभिनेत्री का आवडत नाहीत? ग्लुटाथिओन इंजेक्शन्स आणि लेजर उपचारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

'इमर्जन्सी' सिनेमाबद्दल...
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर कंगना राणौतचा चित्रपट इमर्जन्सी बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करत आहे. कंगनाने या चित्रपटात केवळ अभिनयच केला नाही तर ती त्याची निर्माती आणि दिग्दर्शिकाही आहे. हा चित्रपट करण्यासाठी तिला घर गहाण ठेवावे लागल्याचे कंगनाने सांगितले. 

Web Title: "Why is fair skin preferred?", Kangana Ranaut was impressed by viral girl Monalisa's dark skin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.