"रुकना मुश्किल है...", असं का म्हणतोय शाहिद कपूर?, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 03:53 PM2024-04-12T15:53:38+5:302024-04-12T15:54:23+5:30

Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूरने नुकतेच शेल लुब्रिकंट्स इंडियाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने शेलचा अपग्रेडेड पोर्टफोलिओची नवीन मर्यादित आवृत्ती लाँच केली.

Why is Shahid Kapoor saying "Rukna mushkil hai..."? | "रुकना मुश्किल है...", असं का म्हणतोय शाहिद कपूर?, जाणून घ्या याबद्दल

"रुकना मुश्किल है...", असं का म्हणतोय शाहिद कपूर?, जाणून घ्या याबद्दल

अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) नुकताच  'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' चित्रपटात पाहायला मिळाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सनॉन मुख्य भूमिकेत झळकली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. त्यानंतर आता तो देवा या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान नुकतेच त्याने शेल लुब्रिकंट्स इंडियाच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने शेलचा अपग्रेडेड पोर्टफोलिओची नवीन मर्यादित आवृत्ती लाँच केली.

शाहिद कपूर लुब्रिकंट्स इंडियाचा ब्रँड अ‍ॅम्सेबेसिडर असून या रेंजचं उद्घाटन करताना तो म्हणाला की, “शेल अ‍ॅडव्हान्सच्या अपग्रेडेड पोर्टफोलिओसाठी काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. या पोर्टफोलिओमुळे इंजिनचं आयुष्य तर वाढेलच पण वाहनं चालवण्याचा अनुभवही आनंददायी होईल. ही नवीन उत्पादनं वापरून आता आम्ही देशभर भटकणार आहोत त्यामुळे ‘रुकना मुश्किल है’ हे आमचं घोषवाक्य सार्थ ठरणार आहे. शेल अ‍ॅडव्हान्स्डचा स्पेशल एडिशन पॅक घ्या आणि माझ्याबरोबर या रंजक प्रवासात सहभागी व्हा.” 

नवीन शेल अ‍ॅडव्हान्स AX७ सिथेंटिक तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना गाडी चालवणे आणखी सुलभ होते. तसंच फ्लेक्सी मॉलिक्युल टेक्नॉलॉजीमुळे इंजिनातून चाकांमध्ये होत असलेले पॉवर ट्रान्स्फरचे कार्य अतिशय प्रभावीपणे होते. अपग्रेडेड शेल अ‍ॅडव्हान्स AX५ प्रिमिअम मिनरल ऑइल मध्ये अ‍ॅडव्हान्स्ड क्लिन्सिंग टेक्नॉलॉजी आणि काही अतिरिक्त वैशिष्ट्यं आहेत त्यामुळे गाडीच्या इंजिनचं आयुष्य सुधारतं. 

वर्कफ्रंट
अभिनेता शाहिद कपूर बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. फिल्मी पार्श्वभूमी असतानाही त्याने स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. प्रसिद्ध कोरियोग्राफर शामक दावरसोबत त्याने त्याच्या करिअरची सुरूवात केली. २००३ साली 'इश्क विश्क' सिनेमातून त्याने रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. याशिवाय तो 'विवाह', 'जब वी मेट', 'कमिने', 'उडता पंजाब', 'हैदर' या गाजलेल्या सिनेमांमध्ये तो दिसला. गेल्या काही वर्षात प्रदर्शित झालेल्या 'पद्मावत', 'कबिर सिंग', 'जर्सी' या सिनेमांमध्ये शाहिदच्या अभिनयाची वेगळी बाजू पाहायला मिळाली. 'फर्जी' ही त्याची वेब सीरिजही प्रचंड गाजली. सध्या तो आगामी चित्रपट देवामुळे चर्चेत आहे. 
 

Web Title: Why is Shahid Kapoor saying "Rukna mushkil hai..."?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.