NCB ऑफिसमध्ये दिसून आला अभिनेता जावेद जाफरी, म्हणाला - पर्सनल कामासाठी आलो होतो...

By अमित इंगोले | Published: November 6, 2020 09:47 AM2020-11-06T09:47:10+5:302020-11-06T09:47:50+5:30

एनसीबी टीमने बी-टाऊन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली. अशात अभिनेता जावेद जाफरी एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचला होता. मात्र, हे समजू शकलं नाही की, तो तिथे का गेला होता.

Why Javed Jaffrey reached NCB office on thursday | NCB ऑफिसमध्ये दिसून आला अभिनेता जावेद जाफरी, म्हणाला - पर्सनल कामासाठी आलो होतो...

NCB ऑफिसमध्ये दिसून आला अभिनेता जावेद जाफरी, म्हणाला - पर्सनल कामासाठी आलो होतो...

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या केसमधून ड्रग अ‍ॅंगल समोर आल्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो अ‍ॅक्टिव झाला आहे. ड्रग्स प्रकरणावरून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक झाली होती. त्यानंतर जसजसा तपास पुढे गेला ड्रग्सचं बॉलिवूड कनेक्शन समोर येऊ लागलं. एनसीबी टीमने बी-टाऊन इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींची चौकशी केली. तर अनेक ड्रग्स पेडलर्सना अटकही करण्यात आली. अशात अभिनेता जावेद जाफरी एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचला होता. मात्र, हे समजू शकलं नाही की, तो तिथे का गेला होता.

१५ मिनिटे एनसीबी ऑफिसमध्ये होता जावेद जाफरी

जावेद जाफरी गुरूवारी एनसीबी ऑफिसमध्ये होता आणि साधारण १५ मिनिटे तो तिथे थांबून परत गेला. एनसीबीच्या ऑफिसमधून बाहेर पडल्यावर त्याने मीडियासोबत बोलण्यासाठी टाळाटाळ केली आणि कारमध्ये बसून निघून गेला. तो केवळ इतकंच म्हणाला की, त्याचं इथे एक पर्सनल काम होतं आणि काही सल्ला घ्यायचा होतो म्हणून तो आला होता. तो हेही म्हणाला की, तो कुणाचीही तक्रार करण्यासाठी इथे आला नव्हता.

जावेद जाफरीचा सिनेमा येणार

वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जावेद जाफरी शेवटचा आयुष्मा खुराणाच्या 'बाला' सिनेमात दिसला होता. यात त्याने बच्चन दुबेची इंटरेस्टींग भूमिका साकारली होती. तो आता आगामी 'कुली नं.१', 'सूर्यवंशी' आणि 'भूत पोलीस' या सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.

दीपिकाच्या मॅनेजरची  पुन्हा चौकशी

दरम्यान, एनसीबी समन्सकडे दुर्लक्ष करीत अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री दीपिका पादुकोनची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिने बुधवारी मात्र चौकशीसाठी कार्यालयात हजेरी लावली होती. तिच्या घरात सापडलेल्या ड्रग्जच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी तिच्याकडे कसून चौकशी केली गेली. मात्र ती पूर्ण न झाल्याने आवश्यकतेनुसार तिला पुन्हा बोलाविण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले होते.

करिष्माच्या याचिकेवर ७ नोव्हेंबरला सुनावणी होईल, तोपर्यंत तिला अटक न करण्याची सूचना न्यायालयाने दिली. तर चौकशीसाठी ती गैरहजर राहत असल्याची तक्रार एनसीबीने केली होती, त्यावर कोर्टाने हमी दिल्याने ती हजर झाली.
 

Web Title: Why Javed Jaffrey reached NCB office on thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.