प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2022 12:22 PM2022-01-24T12:22:41+5:302022-01-24T12:34:44+5:30
Priyanka Chopra surrogacy reason: प्रियंकाच्या सरोगसीद्वारे आई बनण्याच्या निर्णयावर बरीच टीका होताना दिसतेय. अनेकांच्या मते, फर्टिलिटीबाबतच्या समस्येमुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला असावा. पण खरं कारण कदाचित वेगळंच आहे.
Priyanka Chopra surrogacy reason: ग्लोबल स्टार प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) नुकतेच आई-बाबा झालेत. सरोगसीच्या माध्यमातून प्रियंकाने बाळाला जन्म दिला. प्रियंकाला मुलगा झाला की मुलगी, हे अद्याप तिने अधिकृतपणे स्पष्ट केलेलं नाही. पण प्रियंकाला मुलगी झाल्याची माहिती आहे. तूर्तास प्रियंकाच्या सरोगसीद्वारे आई बनण्याच्या निर्णयावर बरीच टीका होताना दिसतेय. अनेकांच्या मते, प्रियंका जवळपास 40 वर्षांची आहे. फर्टिलिटीबाबतच्या समस्येमुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला असावा. पण खरं कारण कदाचित वेगळंच आहे. प्रियंका आणि निकने सरोगसीचा पर्याय का निवडला? याचं कारण फर्टिलिटी इश्यू नसून वेगळंच असल्याची चर्चा आहे.
बॉलिवूड लाईफने दिलेल्या एका वृत्तानुसार, प्रियंकाला फर्टिलिटीबाबत कोणतीही समस्या नाही. पण आता तिचं वय 39 वर्ष आहे आणि या वयात बाळ होणं तिच्यासाठी सोपी गोष्ट नाही. त्यातच तिच्या बिझी शेड्यूडमुळे ही गोष्ट आणखीच कठीण झाली असती. प्रियंका व निक प्रचंड बिझी आहेत. त्यांना एकमेकांसाठीही पुरेसा वेळ नाही. कदाचित त्यामुळे या जोडप्याने सरोगसीचा मार्ग निवडला.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका एजन्सीच्या मदतीने प्रियंका व निकने सरोगेस मदरची भेट घेतली. ही या महिलेची पाचवी सरोगसी आहे. हे दोघेही तिला भेटले आणि त्यांना ती आवडली. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय घेतला. दरम्यान प्रियांका आणि निकच्या बाळाचा जन्म एप्रिलमध्ये होणार होता, मात्र प्री-मॅच्युअर डिलीव्हरी झाली आहे.
रिपोर्टनुसार, प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांचं बाळ 27 व्या आठवड्यात जन्माला आलं आहे. बाळ आणि सरोगेट आई कॅलिफोर्नियाच्या एका रुग्णालयात आहेत. बाळाचा जन्म एप्रिल महिन्यात होणार होता. मात्र त्या आधीच त्याचा जन्म झाल्यानं बाळाला रुग्णालयातच ठेवण्यात आलं आहे. तसेच आणखी काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेण्यात येणार आहे.