चेहरा लपवत फिरण्याची वेळ आली 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर, 'या' गोष्टीमुळे करावा लागतोय इतका खटाटोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 12:45 PM2019-10-03T12:45:57+5:302019-10-03T12:50:09+5:30

आपल्या लाडक्या कलाकाराला रूपेरी पडद्यावर पाहण्याआधी प्रत्यक्ष पाहण्याची संधी काही मुंबईकरांनी अनुभवली तर काहींनी ही संधी गमावली होती.

Why Ranveer Singh Cover His Face In Public, See Pics | चेहरा लपवत फिरण्याची वेळ आली 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर, 'या' गोष्टीमुळे करावा लागतोय इतका खटाटोप

चेहरा लपवत फिरण्याची वेळ आली 'या' प्रसिद्ध अभिनेत्यावर, 'या' गोष्टीमुळे करावा लागतोय इतका खटाटोप

googlenewsNext

सेलिब्रिटींवर फॅन्स जीव ओवाळून टाकतात. आपल्या लाडक्या कलाकाराची एक झलक पाहण्यासाठी सारेच आतुर असतात. अतिउत्साही फॅन्स याचा गैरवापर करत सेलिब्रिटींना कशाप्रकारे त्रास देतात हे याची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे या गोष्टी टाळण्यासाठी कधी कधी सेलिब्रेटींनाच वेगवेगळ्या युक्त्या लढवत ते कोणाला दिसू शकणार नाही अशा रितीने पेहराव करत सार्वजनिक ठिकाणी फिरावे लागते.

चेह-यावर स्कार्फ बाधंत कोणता सेलिब्रेटी आपल्या बाजुनेही गेला असेल तरी कळणार नाही अशा रितीने त्यांचा पेहराव केलेला असतो.  

नुकतेच बॉलीवुडचा बाजीराव रणवीर सिंहलाही अशाच रितीने चेहरा लपवत फिरण्याची वेळ आली आहे. लाल रंगाचा झब्बा  आणि जीन्स अशी विचित्र ड्रेसिंग करत तो घराबाहेर पडला होता. यावेळी त्याने त्याचा चेहरा कोणालाही दिसू नये म्हणून अशा प्रकारे कपडे घातले असावे आणि चेहरा लवपला असावा अशा चर्चा सुरू आहेत. इतकेच नाही तर यावेळी रणवीर त्याच्या विचित्र कपड्यांमुळे लहान मुलगाही घावरून रडू लागला. या लहाना मुलाच्या रणवीरला बघून थरकाप उडाल्याचा व्हिडीओही समोर आला आहे. रणवीर सिंहचा ड्रेसिंग सेन्स आता काही नवीन राहिलेल नाही. तो नेहमीच हटके करण्याच्या नादात असेच काहीतरी विचित्र फॅशन करत येत असल्याचे आपण पाहिले आहे.  


तुर्तास रणवीर सिंहने अशा प्रकारे फिरण्याची ही पहिली वेळ नाही. या आधीही  झोया अख्तरच्या 'गल्ली बॉयज' या सिनेमाच्या शुटिंगवेळी  तो चॉकलेटी टी - शर्ट, डेनिम जॅकेट आणि जीन्स या अंदाजात गोरेगावच्या पूलावर  फिरताना दिसला होता. मात्र त्याचा अंदात इतका साधा होता की, कुणीही त्याला ओळखू शकलं नाही. त्यावेळी देखील आपल्या लाडक्या कलाकाराला रूपेरी पडद्यावर पाहण्याआधी प्रत्यक्ष पाहण्याची संधी काही मुंबईकरांनी अनुभवली तर काहींनी ही संधी गमावली होती. 

आयफा रॉक 2019 या अवॉर्ड सोहळ्यात रणवीरने आपल्या अनोख्या अंदाजाने पुन्हा एकदा सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. रणवीरने आयफा अवॉर्डसाठी निळसर रंगाचा आऊटफिट परिधान केला  होता या आऊटफिटवर त्याने काळ्या रंगाची काठी हातात घेतली होती. त्यांची ही ड्रेसिंग स्टाइल थोडी अतरंगी वाटत असली तरी  तो जे काही करतो तेच तरुणाईचं स्टाइल स्टेटमेंट बनत असल्याचे दिसतंय. त्यामुळे रणवीर सिंहची स्टायलिश अंदाज हा थोडा निराळा असला तरीही इंटरेस्टींग वाटत असल्याच्या त्याला प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.

Web Title: Why Ranveer Singh Cover His Face In Public, See Pics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.