४३ वर्षांपासून बिग बींसोबत सिनेमात काम का केलं नाही? रेखा म्हणाल्या- 'अभिनेत्री म्हणून माझं नुकसान...'
By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2024 12:39 PM2024-10-11T12:39:09+5:302024-10-11T13:00:40+5:30
रेखा यांनी अमिताभ यांच्यासोबत काम का नाही केलं याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता (rekha, amitabh bachchan)
आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस. अमिताभ आज त्यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अमिताभ यांच्यावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील चाहते प्रेम करतात. 'सात हिंदुस्थानी', 'आनंद' पासून करिअरची सुरुवात केलेल्या आज बिग बींचा 'वेट्टियन' सिनेमा रिलीज झालाय. अमिताभ यांची मनोरंजन विश्वात अनेक अभिनेत्रींसोबत जोडी गाजली. त्यापैकी प्रमुख अभिनेत्री म्हणजे रेखा. अमिताभ यांच्यासोबत सिनेमांचा 'सिलसिला' अचानक का थांबला? याविषयी रेखा यांनी एका जुन्या मुलाखतीत खुलासा केला होता.
रेखा-अमिताभ यांचा ४३ वर्षांपासून एकही सिनेमा का नाही?
रेखा आणि अमिताभ बच्चन यांचा शेवटचा सिनेमा म्हणजे 'सिलसिला'. हा सिनेमा रिलीज होऊन आता ४३ वर्ष उलटली आहेत. गेल्या ४३ वर्षात अमिताभ यांच्यासोबत सिनेमात काम का केलं नाही? याविषयी २००६ मधील फिल्मफेअर सोहळ्यात रेखा म्हणाल्या होत्या की, "अमितजी यांच्यासोबत काम करायला न मिळणं हे एक अभिनेत्री म्हणून माझं नुकसान आहे. या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर, अमितजींसोबत सहकलाकार म्हणून काम करण्यासाठी वाट पाहणं योग्य आहे. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी योग्य कारणांनी होते. हा निर्णय अनेकदा दिग्दर्शकांचा असतो. त्यामुळे मला अजूनही त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली नाही." अशा भावना व्यक्त करत 'सब्र का फल मीठा होता है' असं रेखा शेवटी म्हणाल्या.
.. majboor yeh halaat
— Film History Pics (@FilmHistoryPic) August 25, 2022
idhar bhi hai udhar bhi ..
main aur meri tanhaayi ...
Amitabh Bachchan & Rekha in ‘Silsila’ : released on 14 Aug 1981 pic.twitter.com/Xmb7qCZxxo
रेखा आणि अमिताभ यांचा शेवटचा सिनेमा
रेखा आणि अमिताभ बच्चन या दोघांनी 'दो अंजाने', 'मुकद्दर का सिकंदर', 'मिस्टर नटवरलाल', 'गंगा की सौगंध' हे सिनेमे खूप गाजले. अमिताभ-रेखा यांचा शेवटचा सिनेमा म्हणजे 'सिलसिला'. यश चोप्रा दिग्दर्शित 'सिलसिला' सिनेमानंतर अमिताभ-रेखा यांचा एकही सिनेमा रिलीज झाला नाही. अमिताभ-रेखा यांच्या अफेअरच्या चर्चाही खूप रंगल्या होत्या. परंतु दोघांनी कधी जाहीरपणे याविषयी खुलासा नाही. अमिताभ यांचं पुढे जया यांच्यासोबत लग्न झालं. त्यानंतर अमिताभ-रेखा यांचं अफेअर चर्चा संपुष्टात आल्या.