म्हणून सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला कधीच बोलवत नाही पार्टींना, कारण वाचून बसेल धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 05:12 PM2021-05-26T17:12:57+5:302021-05-26T17:14:22+5:30

सलमान आणि नवाझुद्दीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याला कधीच त्याच्या घरातील पार्टींना बोलवत नाही, असं करण्यामागे एक खास कारण आहे.

Why Salman Khan doesn’t invite Nawazuddin Siddiqui to his parties? | म्हणून सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला कधीच बोलवत नाही पार्टींना, कारण वाचून बसेल धक्का

म्हणून सलमान खान नवाझुद्दीन सिद्दीकीला कधीच बोलवत नाही पार्टींना, कारण वाचून बसेल धक्का

googlenewsNext
ठळक मुद्देसलमान खानसोबत तर तो किक आणि बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटात झळकला आहे.

नवाझुद्दीन सिद्दीकीने आज त्याच्या मेहनतीच्या बळावर बॉलिवूडमध्ये त्याचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आजच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याचे नाव घेतले जाते. एवढेच नव्हे तर सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत तो चित्रपटांमध्ये झळकला आहे. सलमान आणि नवाझ यांच्यात तर खूपच चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याच्या घरातील पार्टींना कधीच नवाझला बोलवत नाही आणि यामागे एक खास कारण असल्याचे सलमाननेच त्याच्या एका मुलाखतीत सांगितले होते.

नवाझुद्दीनने आमिर खानसोबत तलाशमध्ये तर शाहरुख खानसोबत रईसमध्ये काम केले आहे. सलमान खानसोबत तर तो किक आणि बजरंगी भाईजान यांसारख्या चित्रपटात झळकला आहे. सलमान आणि नवाझुद्दीन यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून खूप चांगली मैत्री आहे. पण सलमान त्याला कधीच त्याच्या घरातील पार्टींना बोलवत नाही, असं करण्यामागे एक खास कारण आहे. सुरुवातीला सलमान त्याला सगळ्या पार्टींमध्ये नवाझला बोलावत असे. पण नवाझुद्दीनला कोणत्याही पार्टीत जायला आवडत नाही. पार्टींमध्ये रमणारा मी नाहीये असे तो अनेकवेळा सांगतो. पण तरीही सलमानच्या मैत्रीखातर तो त्याच्या पार्टींना आवर्जून जात असे. पण तिथे तो एकदम शांत बसत असे. कोणामध्येही मिसळत नसे. यावरून नवाझुद्दीन पार्टींमध्ये कर्म्फटेबल नसतो हे सलमानच्या लक्षात आले आणि त्याचमुळे सलमानने त्याला पार्टींसाठी निमंत्रण देणेच आता बंद केले आहे.

नवाझुद्दीनचा बॉलिवूडमधील प्रवास अतिशय खडतर होता. तो एका छोट्याशा गावातून आलेला आहे. त्याच्या कुटुंबातील कोणाचाच या इंडस्ट्रीशी संबंध नाहीये. त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बेताची होती. पण तरीही अभिनयक्षेत्रात यायचे असे त्याने अनेक वर्षांपूर्वीच ठरवले होते. त्यामुळे तो नशीब आजमवायला छोट्याशा गावातून मुंबईत आला. मुंबईत आल्यावर सुरुवातीला अनेक चित्रपटांमध्ये त्याने छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या. सरफरोश, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या चित्रपटात तो छोट्याशा भूमिकांमध्ये झळकलेला आहे. ब्लॅक फ्रायडे या चित्रपटामुळे त्याच्या करियरला खरी दिशा मिळाली.

Web Title: Why Salman Khan doesn’t invite Nawazuddin Siddiqui to his parties?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.