सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 10:49 AM2024-06-25T10:49:22+5:302024-06-25T10:51:06+5:30

सलमान खानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं. पण तो लग्न का करत नाही? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय (salman khan, salim khan)

why salman khan not married yet father salim khan told reason | सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

सलमान खान लग्नाला का घाबरतो? वडील सलीन खान म्हणतात- "तो प्रत्येक मुलीत आई पाहतो.."

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सर्वांचा आवडता अभिनेता. सलमान खानने कधी 'दबंग' मधून मारधाड केली तर कधी 'मैने प्यार किया' मधून 'प्रेम' करायला शिकवलं. सलमान खानच्या चाहत्यांना एकच प्रश्न वारंवार सतावत असतो तो म्हणजे सलमान लग्न कधी करणार? वयाची पन्नाशी उलटली तरीही सलमान अजून सिंंगल आहे. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं पण लव्हस्टोरी लग्नापर्यंत येऊन पोहोचली नाही. अशातच सलमान लग्नाला का घाबरतो? याविषयी सलीम खान यांनी मौन सोडलंय.

घर सांभाळणारी मुलगी त्याला हवीय: सलीम खान

 सलमान खान लग्न का करत नाही याबद्दल बोलताना सलीम खान म्हणाले, "सलमान खूप साधा माणूस आहे. तो सहजपणे रिलेशनशीपमध्ये येतो परंतु लग्न करण्याचे धाडस तो दाखवू शकत नाहीत. तो मनाने खूप साधा आहेत. त्यामुळे तो लगेच कोणाकडे तरी आकर्षित होतो. पण तो लग्न करण्याचे धाडस दाखवू शकत नाही कारण त्याला वाटते की, तो जिच्याशी लग्न करेल ती मुलगी त्यांचे घर सांभाळू शकणार नाही."


सलीम खान पुढे म्हणतात, "सलमानला एका अशा महिलेला आपली जीवनसाथी बनवायची आहे जी कुटुंबावर प्रेम करेल. पती आणि कुटुंबाशी बांधिलकी असलेली, आपल्या आईसारखी मुलगी शोधावी, असे सलमानला वाटते. आता आजच्या काळात घर सांभाळणारी, मुलांची काळजी घेणारी, घरची कामे करून घेणारी मुलगी कुठे मिळणार? सलमानला अशी मुलगी हवी आहे जी त्याच्या कुटुंबाला एकत्र ठेवू शकेल." सलमान खान अजूनही अविवाहित असला तरी त्याने अनेक अभिनेत्रींना डेट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्याने संगीता बिजलानीपासून सोमी अली, ऐश्वर्या राय आणि कतरिना कैफपर्यंत सर्वांना डेट केले आहे.

Web Title: why salman khan not married yet father salim khan told reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.