Mahesh Babu : मी प्रिन्स आहे, बॉलिवूडचा भिकारी का बनू? महेश बाबू 5 वर्षाआधी असंच बोलला होता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 13:38 IST2022-05-11T13:35:51+5:302022-05-11T13:38:02+5:30
Mahesh Babu : मी बॉलिवूडला परवडणार नाही, असं महेशबाबू बोलला. त्याच्या या वक्तव्यामुळे सगळेच हैराण झालेत. अर्थात हे पहिल्यांदा नाही. 5 वर्षांआधीही महेश बाबूनं बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? या प्रश्नावर असंच हैराण करणारं उत्तर दिलं होतं.

Mahesh Babu : मी प्रिन्स आहे, बॉलिवूडचा भिकारी का बनू? महेश बाबू 5 वर्षाआधी असंच बोलला होता
बॉलिवूड मुझे अफोर्ड नहीं कर सकता, असं तेलगू सुपरस्टार महेश बाबू ( Mahesh Babu) म्हणाला आणि बॉलिवूडकरांच्या भुवया उंचावल्या. मी बॉलिवूडला परवडणार नाही. मग मी बॉलिवूडमध्ये माझा वेळ फुकट का घालवू? असं काय काय महेशबाबू बोलला. त्याच्या या वक्तव्यामुळे सगळेच हैराण झालेत. महेशबाबू अशी किती फी घेतो की, बॉलिवूड त्याला अफोर्ड करू शकत नाही? असा सवालही अनेकांच्या मनात आला. सोशल मीडियावर सध्या याचीच चर्चा सुरू आहे. अर्थात हे पहिल्यांदा नाही. 5 वर्षांआधीही महेश बाबूनं बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार का? या प्रश्नावर असंच हैराण करणारं उत्तर दिलं होतं.
पाच वर्षांआधी महेश बाबूनं ‘’ ला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्याला बॉलिवूडमध्ये काम करण्याबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. रजनीकांत, कमल हासन, धनुष असे बडे साऊथ स्टार बॉलिवूडमध्ये काम करत असताना तू बॉलिवूडमध्ये जाण्यास का टाळाटाळ करतो आहेस? असा सवाल या मुलाखतीत त्याला करण्यात आला होता. या प्रश्नावर महेश बाबूनं असंच काहीसं उत्तर दिलं होतं. ‘बॉलिवूडमध्ये जाण्याची माझी कोणतीही इच्छा नाही. तेलूग चित्रपटांत माझ्यासाठी खूप सारं काम आहे. आयुष्यभर काम केलं तरी ते संपणार नाही. मला बॉलिवूडनं कितीही आकर्षक ऑफर दिली तरी मी हिंदी सिनेमात जाणार नाही,’असं तो म्हणाला.
यानंतर एका मुलाखतीत पुन्हा याच मुद्यावर महेश बाबू बोलला होता. बॉलिवूडमध्ये एखादी एक्साइटिंग ऑफर असेल तर मी काम करेल, असं एका मुलाखतीत म्हणाल्याचं त्याच्या लक्षात आणून दिल्यावर त्यानं घुमजाव केलं होतं. होय, एखादी चांगली ऑफर आली तर मी बॉलिवूडमध्ये काम करणार, असं मी एकदा म्हणालो होतो. पण ते फक्त मी चर्चा थांबवण्यासाठी बोललो होतो. आता मात्र मी स्पष्ट सांगणार आहे. बॉलिवूडच्या उंदीर मांजराच्या शर्यतीत सामील होण्यात मला काहीही इंटरेस्ट नाही. मी तेलगू चित्रपटांचा प्रिन्स आहे. मग मी बॉलिवूडचा भिकारी का बनू? अशा शब्दांत त्यानं बॉलिवूडमध्ये काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं.
महेश बाबू तेलगू चित्रपटसृष्टीत प्रिन्स म्हणून ओळखला जातो. तो एका चित्रपटासाठी 80 कोटींपर्यंत फी घेतो.