​काजोलला का जाणवतेयं सोशल मीडियाचे ‘बर्डन’ ?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 05:08 AM2017-09-17T05:08:01+5:302017-09-17T10:38:25+5:30

काजोल आपल्या मुलीच्या आग्रहावरून सोशल मीडियावर आली खरी पण कदाचित सोशल मीडिया हे प्रकरण काजोजला फारसे ‘पचलेले’ दिसत नाही. ...

Why should Kajol do the 'Burden' of social media? | ​काजोलला का जाणवतेयं सोशल मीडियाचे ‘बर्डन’ ?

​काजोलला का जाणवतेयं सोशल मीडियाचे ‘बर्डन’ ?

googlenewsNext
जोल आपल्या मुलीच्या आग्रहावरून सोशल मीडियावर आली खरी पण कदाचित सोशल मीडिया हे प्रकरण काजोजला फारसे ‘पचलेले’ दिसत नाही. होय, काजोल जे बोलतेय, त्यावरून तरी असेच वाटतेय. खरे तर आजघडीला बॉलिवूडचा प्रत्येक सेलिब्रिटी (बोटावर मोजण्याइतके काही अपवाद सोडले) सगळेचे सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत. आपल्या पर्सनल लाईफपासून तर प्रोफेशनल लाईफपर्यंतच्या सगळ्या गोष्टी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना हे सेलिब्रिटी कचरत नाहीत. पण बॉलिवूडची ‘चुलबुली’ अभिनेत्री काजोलला मात्र सोशल मीडियावर शेअर होण्याऐवजी भलतचं काही वाटतयं.
होय, कधीतरी पती आणि मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणाºया काजोलच्या मते, सोशल मीडिया हे ‘बर्डन’ आहे. अलीकडे एका मुलाखतीत काजोलने सोशल मीडियाबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. रोज चाहत्यांशी बोलणे आणि मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणे, मला आवडत नाही. निश्चितपण मला सोशल मीडियाचा काही भाग आवडतो. पण याठिकाणची प्रत्येक गोष्ट आवडते असे नाही. मला अनेकदा सोशल मीडिया म्हणजे खूप मोठे ‘बर्डन’ आणि डोकेदुखी वाटते. मला माहितीयं की, अनेकांना सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहणे आवडते. एकमेकांसोबत सोशल मीडियावर एंगेज राहणेही त्यांना पटते. पण मी त्यापैकी नाही, असे काजोल एका मुलाखतीत म्हणाली.
अलीकडे काजोल बीफ खाण्यावरून सोशल मीडियावर ट्रोल झाली होती. यावर काजोलने स्पष्टीकरणही दिले होते. अगदी अलीकडे बकरी ईद आणि गणेशोत्सवाच्या एकत्र शुभेच्छा दिल्यावरून युजर्सनी तिला ट्रोल केले होते.

ALSO READ : ​काजोलवर दर दुस-या दिवशी चिडतो अजय देवगण! पण का?

काजोल अलीकडेच अभिनेता धनुषसोबत ‘व्हिआयपी2’मध्ये दिसली होती. लवकरच काजोल तिचा लाडका हबी अजय देवगणसोबत दिसण्याची शक्यता आहे. होय, प्रदीप सरकारच्या एका चित्रपटात काजोल व अजय ही जोडी पुन्हा एकदा दिसणार असल्याचे कळतेय.   काजोल व अजयची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावते. याआधीही ‘राजू चाचा’, ‘प्यार तो होना ही था’,‘दिल क्या करे’ आदी चित्रपटांत या जोडीची केमिस्ट्री दिसली होती.

Web Title: Why should Kajol do the 'Burden' of social media?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.