का आहे श्रुती नाराज?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2017 07:31 PM2017-01-01T19:31:28+5:302017-01-01T19:31:28+5:30
‘चाची ४२०’ साठी स्त्री भूमिका करणारा अभिनेता कमल हसन कधी कुणाला नाराज करू शकतो का? तर हो. ते देखील ...
‘ ाची ४२०’ साठी स्त्री भूमिका करणारा अभिनेता कमल हसन कधी कुणाला नाराज करू शकतो का? तर हो. ते देखील त्याची स्वत:ची मुलगी श्रुती हसन हिला. वडिलांनी नाराज केल्याची तक्रार खुद्द तिनेच केलीयं. स्वत:च्या वडिलांबद्दल अशी तक्रार तिने का केली? असा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे. याचे उत्तर देताना ती म्हणते, ‘वडिलांसोबत काम करण्याचा अनुभव फार वेगळा होता. त्यांच्या व्यक्तीमत्त्वाकडे पाहिले की, मी नर्व्हस होत असे. केवळ तेच नाही तर त्यांच्याप्रमाणे इतरही काही दिग्गज दिग्दर्शक यांच्यासमोर कॅमेऱ्याचा सामना करावयाचा म्हणजे सगळयात मोठ्ठं संकट होतं. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करताना मी नेहमी नाराज असायचे.’
वडिलांसोबत काम करायला मिळणं हे एखाद्या अभिनेत्रीसाठी किती अभिमानाची बाब असेल. पण, श्रुतीच्या बाबतीत काही ते पटत नाही. हसन यांच्यासोबत काम करताना तिला येणाऱ्या अडचणींबद्दल बोलतांना ती म्हणते,‘मला माझ्या वडिलांसमोर उत्तम अभिनयाचं सादरीकरण करायचं असतं. मात्र, त्याचं व्यक्तिमत्त्वच एवढं प्रभावी आहे की, मी कॅमेऱ्यासमोर गेले की मला काहीच सुचत नाही. माझ्या दृष्टीने मी पूर्णपणे उत्तम देण्याचा प्रयत्न करत असते पण मी असमर्थ ठरते.’ तिची बहीण अक्षरा हसन ही देखील आता तिचे वडील कमल हसन यांना दिग्दर्शनाच्या कामात मदत करते आहे. वडीलांसोबत काम करणं हे तिच्यासाठी खूप चांगलं असल्याची कबुलीही तिने दिली.