Shweta bachchan-nanda: 'या' कारणामुळे नवऱ्याचं घर सोडून बिग बींची लेक राहते माहेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 07:06 PM2021-12-24T19:06:20+5:302021-12-24T19:07:14+5:30

Shweta bachchan-nanda: दोन मुलांच्या जन्मानंतरही ती पतीपासून वेगळी राहत असल्याचं पाहायला मिळतं. यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे. 

why shweta bachchan nanda lives with her parents and not with her husband here is what we know so far | Shweta bachchan-nanda: 'या' कारणामुळे नवऱ्याचं घर सोडून बिग बींची लेक राहते माहेरी

Shweta bachchan-nanda: 'या' कारणामुळे नवऱ्याचं घर सोडून बिग बींची लेक राहते माहेरी

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (amitabh bachchan) गेल्या कित्येक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवत आहेत. त्यामुळे आजच्या घडीला त्यांचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे बिग बींसोबतच त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. यामध्येच सध्या बिग बींच्या लेकीची म्हणजे श्वेता बच्चन नंदा (Shweta bachchan-nanda) हिची चर्चा रंगली आहे. अनेकदा श्वेता कोणत्याही कार्यक्रमात, सोहळ्यात वा फंक्शनमध्ये बच्चन कुटुंबासोबतच दिसून येते. त्यामुळे अनेकदा नेटकऱ्यांना श्वेताच्या पतीविषयी काही प्रश्न पडतात. बऱ्याचदा श्वेताचा पती कोणत्याही कार्यक्रमात दिसत नसल्यामुळे श्वेता त्याच्यापासून विभक्त झालीये का? ती लग्नानंतरही आपल्या मुलांसह माहेरी का राहते? असे असंख्य प्रश्न नेटकऱ्यांना पडतात. त्यामुळेच श्वेता आणि तिचा पती स्वतंत्र का राहतात ते जाणून घेऊयात.

श्वेता बिग बींची लेक असण्यासोबतच एक उत्तम लेखिका, फॅशन डिझायनर आणि मॉडल आहे. त्यामुळे आपल्या वडिलांप्रमाणेच श्वेतानेदेखील कलाविश्वात तिचं स्थान निर्माण केलं आहे. परंतु, दोन मुलांच्या जन्मानंतरही ती पतीपासून वेगळी राहत असल्याचं पाहायला मिळतं. यामागचं कारण नुकतंच समोर आलं आहे. 

श्वेताच्या पतीचं नाव निखिल नंदा असं असून ते गेल्या कित्येक काळापासून स्वतंत्र राहत आहेत. परंतु, ते विभक्त राहत असले तरीदेखील त्यांच्या नात्यात कोणत्याही प्रकारचे मतभेद किंवा मनभेद नसल्याचं सांगण्यात येतं. केवळ दोघांची प्रोफेशनल लाइफ वेगळी असल्यामुळे त्यांना एकमेकांपासून दूर रहावं लागतं. निखिल आणि श्वेता दोघंही वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे. निखिल एस्कॉर्ट ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. तर, श्वेता कलाविश्वात कार्यरत आहे. त्यामुळे श्वेताचं बरंचसं काम मुंबईत असतं. त्यामुळे ती तिच्या मुलांसोबत मुंबईत राहते. तर, तिचे पती दिल्लीत राहतात.

दरम्यान, श्वेताचं लग्न लवकरच झालं असून वयाच्या २१ व्या वर्षी तिने निखिल नंदासोबत लग्नगाठ बांधली. विशेष म्हणजे लग्नानंतर १० वर्षांनी श्वेताने तिचं करिअर घडवण्याचा निर्णय घेतला आणि ती दिल्लीहून मुंबईला शिफ्ट झाली. मुंबईतही ती बिग बींच्या घरी राहत नसून तिच्या मुलांसोबत दुसऱ्या घरी राहत असल्याचं सांगण्यात येतं. 

Web Title: why shweta bachchan nanda lives with her parents and not with her husband here is what we know so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.