सिंगापूरच्या रस्त्यांवर का फिरतोय वरूण?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2016 04:02 PM2016-10-28T16:02:59+5:302016-10-28T16:08:32+5:30
शीर्षक वाचून गोंधळलात ना? वरूण धवनवर एवढे काय दिवस आले की तो रस्त्यांवर फिरतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ...
श र्षक वाचून गोंधळलात ना? वरूण धवनवर एवढे काय दिवस आले की तो रस्त्यांवर फिरतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण जरा थांबा... तुम्ही विचार करताय तसे काहीही नाहीयं. कारण वरूण धवन सध्या दिग्दर्शक शशांक खैतान यांच्या ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी आलिया भट्ट सोबत शूटिंग करतो आहे.
सध्या सिंगापूरमध्ये चित्रपटाचे शूटींग सुरु आहे. आता सिंगापूर म्हटल्यावर सैर-सपाटा आलाच. वरूणला मोह आवरता आला नाही आणि सिंगापूरच्या रस्त्यांवर मनसोक्त भटकायला तो बाहेर पडला.
रस्त्यांवर फिरतांनाचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. स्कूटरवरून जातानाचा एक व्हिडिओही त्याने पोस्ट केला आहे. ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलिया-वरूण हे त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट्सवरील फोटो सातत्याने अपडेट करताना दिसत आहेत. कदाचित दोघेही ‘बद्रिनाथ की दुल्हनियाँ’ चित्रपटासाठी स्वत:ला झोकून देऊन काम करत आहेत.