रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- "लहानपणी आजोबा..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 09:24 IST2025-03-13T09:24:24+5:302025-03-13T09:24:49+5:30
कपूर कुटुंबाच्या होळी पार्टीची रणबीरला भीती का वाटायची? अभिनेत्याने उलगडला खास किस्सा

रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची? म्हणाला- "लहानपणी आजोबा..."
होळी अन् रंगपंचमीचा उत्साह सध्या शिगेला आहे. देशभरात सामान्य माणसांपासून ते राजकारणी अन् सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण होळी उत्साहात साजरी करणार आहेत. अशातच बॉलिवूडमध्ये होळीला विशेष महत्व आहे. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या घरी होळीचा सण साजरा करतात. दरवर्षी कपूर कुटुंबाच्या होळीची चांगलीच चर्चा असते. यानिमित्त रणबीर कपूरने (ranbir kapoor) आजोबा राज कपूर (raj kapoor) यांच्या होळी सणाची खास आठवण सांगितली आहे. रणबीरला या होळीत भीती का वाटायची, याचा खुलासा त्याने केलाय.
रणबीर कपूरला होळी साजरी करायला भीती का वाटायची?
डिसेंबर २०२४ मध्ये राज कपूर यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त कपूर कुटुंबाच्या होळीविषयी रणबीरने खुलासा केला होता. रणबीर म्हणाला की, "आजोबा आलिशान पद्धतीने होळी पार्टीचं आयोजन करायचे. मी खूप लहान होतो त्यामुळे माझ्या आसपास जे होळीचं वातावरण होतं त्याची मला भीती वाटायची. सर्वजण चेहऱ्यावर काळा रंग किंवा इतर रंगांनी रंगून गेलेले असायचे. कोणी कोणाला ट्रकमध्ये फेकायचं. सर्वजण काळ्या-निळ्या-पिवळ्या रंगात न्हाऊन निघायचे. हे सर्व वातावरण बघून मला भीती वाटायची."
कपूर कुटुंबाच्या होळी पार्टीत केवळ कलाकार लोक सहभागी व्हायचे नाहीत तर कॅमेरामन, प्रॉडक्शन सांभाळणारी माणसं, क्रू मेंबर्स सुद्धा सामील व्हायचे. सर्वजण एकत्र येऊन होळी साजरी करायचे. कोणताही भेदभाव नसायचा अन् एका अनोख्या पद्धतीने लोक एकत्र यायचे. या पार्टीत अमिताभ बच्चन, नर्गिस अशा दिग्गज कलाकरांपासून कॅमेरामागचे तंत्रज्ञही सहभागी व्हायचे. अशाप्रकारे रणबीरने होळी पार्टीचा खुलासा केला होता. अशाप्रकारे कपूर कुटुंंबात होळी कशी साजरी केली जायची? याचा खुलासा रणबीरने केलाय.