शाहरुख खानसाठी का ठरली ‘ही’ संध्याकाळ अविस्मरणीय?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2017 06:29 AM2017-02-26T06:29:04+5:302017-02-26T11:59:04+5:30

शाहरुख खानला जगभरातील अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. त्याच्या अभिनयासाठी, सामाजिक कार्यासाठी, सिनेसृष्टीतील योगदानासाठी मोठ-मोठ्या पुरस्कारांनी त्याला नावाजण्यात आलेले आहे. ...

Why was Shahrukh Khan's evening 'unforgettable'? | शाहरुख खानसाठी का ठरली ‘ही’ संध्याकाळ अविस्मरणीय?

शाहरुख खानसाठी का ठरली ‘ही’ संध्याकाळ अविस्मरणीय?

googlenewsNext
हरुख खानला जगभरातील अनेक मानसन्मान मिळालेले आहेत. त्याच्या अभिनयासाठी, सामाजिक कार्यासाठी, सिनेसृष्टीतील योगदानासाठी मोठ-मोठ्या पुरस्कारांनी त्याला नावाजण्यात आलेले आहे. परंतु नुकताच त्याला असा सन्मान मिळाला जो त्याला भावनिकदृष्ट्या सर्वात महत्त्वाचा वाटतो.

शाहरुख आणि दिग्दर्शक यश चोप्रा यांनी मिळून अनेक लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली. म्हणून तर शनिवारी जेव्हा यश चोप्रा यांच्या स्मृती प्रीत्यर्थ दिला जाणारा ‘नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड’ त्याला प्रदान करण्यात आला तेव्हा भावनिक होऊन शाहरुख म्हणाला की, आजचा हा सन्मान माझ्या सर्वात महत्त्वाचा आहे. यशजींनी माझे संपूर्ण करिअर घडविले. माझ्या यशाचे श्रेय त्यांना जाते.

SRK

या पुरस्काराचे हे चौथे वर्ष होते. यापूर्वी मेगास्टार अमिताभ बच्चन, लता मंगेशकर आणि रेखा या कलाकारांना ‘नॅशनल यश चोप्रा मेमोरियल अवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आलेले आहे. सिनेसृष्टीतील असामान्य योगादानासाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.

पुरस्कार स्वीकारताना किंग खान म्हणाला की, ‘आजची सायंकाळ माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय सायंकाळ आहे. मी खूप भावनिक आहे. यश चोप्रांनी एकहाती माझे करिअर उभे के ले. त्यामुळे मला घडविलेल्या व्यक्तीच्या स्मरणार्थ दिला जाणार पुरस्कार मला दिला जात असल्यामुळे एका अर्थाने नियतिचे चक्र पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे.’

SRK

सोहळ्यापूर्वी माध्यमांशी बोलताना तो म्हणाला की, यशजींसोबतच्या माझ्या नात्यामुळे मला हा अवॉर्ड मिळत आहे. त्याचे श्रेय मी घेऊ शकत नाही. एवढ्या वर्षांपासून चोप्रा कुटुंबियांनी मला जे प्रेम दिले आहे ते पाहून मी स्वत:ला खरोखरंच खूप भाग्यवान समजतो. बहुधा हेच कारण आहे की, मला आज हा पुरस्कार दिला जात आहे. ही भावना फार वैयक्तिक आहे. मी ती शब्दांत व्यक्त नाही करू शकत. वीस वर्षे आम्ही सोबत काम केले. मी जेव्हा सुरूवात केला तेव्हापासून ते खंबीरपणे माझ्यापाठीशी उभे राहिले. एवढ्या दीर्घ प्रवासानंतर त्यांना गमावण्याचे दु:ख मला पचवणे खूप अवघड आहे.

यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनात शाहरुखने डर, दिल तो पागल है, वीर-झारा आणि जब तक है जान या सिनेमांत काम केलेले आहे.

ALSO READ: ​शाहरुख खानच्या ‘सर्कस’ मालिकेचे टीव्हीवर केले जाणार पुन:प्रक्षेपण

Web Title: Why was Shahrukh Khan's evening 'unforgettable'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.