आमिर खानचा मुलगा जुनैदची बॉलिवूडमध्ये एंट्री, झालाय त्याचा मेकओव्हर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 12:38 PM2021-06-08T12:38:08+5:302021-06-08T12:39:20+5:30
महाराजा या चित्रपटाद्वारे आमिर खानचा मुलगा जुनैद खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
स्टार किडने बॉलिवूडमध्ये एंट्री करणे यात काही नवीन नाही. आता आमिर खानचा मुलगा जुनैद खान देखील बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. महाराजा या चित्रपटाद्वारे तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
महाराजा या चित्रपटाच्या चित्रीकरणाला आजपासून महाराष्ट्रात सुरुवात होणार असल्याचे म्हटले जात आहे. महाराष्ट्र सरकारने कोरोनाचे सगळे नियम पाळून चित्रीकरणास पुन्हा परवानगी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील मरोळ भागात बायो बबल पद्धतीने या चित्रपटाचे चित्रीकरण होणार असल्याचे म्हटले जात आहे. यश राज फिल्मच्या या चित्रपटात जुनैदसोबतच शालिनी पांडे, जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका आहेत.
या चित्रपटाच्या टीमच्या सगळ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली असून कोरोना लसीचा पहिला डोस देखील संपूर्ण टीमला देण्यात आलेला आहे.
गेल्या काही वर्षांत जुनैदमध्ये खूपच बदल झाला आहे. त्याच्या या ट्रान्सर्फोमेशनची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.