अशी करतो आदित्य रॉय कपूर सिनेमांची निवड?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2017 07:25 AM2017-01-30T07:25:55+5:302017-01-30T12:58:15+5:30

बॉलिवूडमध्ये आपल्या दमादार अभिनयाने आज आदित्य रॉय कपूरने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे आपल्या अभिनयालाच  नाही तर सिनेमाही ...

Will Aditya Roy Kapoor choose the movie? | अशी करतो आदित्य रॉय कपूर सिनेमांची निवड?

अशी करतो आदित्य रॉय कपूर सिनेमांची निवड?

googlenewsNext
लिवूडमध्ये आपल्या दमादार अभिनयाने आज आदित्य रॉय कपूरने आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.त्यामुळे आपल्या अभिनयालाच  नाही तर सिनेमाही रसिकांच्या मनात कायम स्मरणात राहावा यासाठी सिनेमाची कथाही नेहमीच महत्त्वाची वाटते.त्यामुळे आपल्यासोबत अथवा आपल्यासमोर कोण अभिनेते किंवा अभिनेत्री आहे, यापेक्षा कथा किती सशक्त आहे, हे पाहूनच चित्रपट स्वीकारतो, असे आदित्य रॉय कपूरने सांगितले. एका मुलाखतीत सिनेमा स्वीकारताना कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतो असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर आदित्य म्हणाला,सर्वप्रथम सिनेमाची कथा समजून घेतो. त्याच्यानंतर दिग्दर्शक कोण आहे, हे मी पाहतो. त्यानंतर निर्माता कोण आहे? प्रत्येकाच्या आयुष्यात ‘यश किंवा अपयश हे येत असते. फितूरसारख्या चित्रपटात कटरिना कैफसारखी अभिनेत्री असताना हा चित्रपट फ्लॉप झाला. कोणताही चित्रपट फ्लॉप झाला की, साहजिकच निराशा येते.मात्र प्रत्येकाला आलेल्या नैराश्येतून बाहेर पडता आले पाहिजे असेही यावेळी आदित्यने. 

कलाकार करत असलेल्या सिनेमाचा प्रोमो आणि गाणी पाहून रसिक तुमचा सिनेमा पाहावा किंवा नाही हे ठरवत असतात.त्यामुळे प्रमोशन कितीही केले तरी चित्रपट यशस्वी होईल, याची खात्री देता येँणे कठीण आहे. जेव्हा मला सिनेमाची कथा आवडते त्यावेळी मी तो सिनेमा करायचे ठरवतो. त्यावेळी माझ्यासह काम करणारे सहकलाकार कोण आहेत? कसे आहेत? याला महत्त्व न देता सिनेमाची कथा हीच हिरो असते असे मी मानत असल्याचे आदित्य रॉय  कपूरने म्हटले आहे. आदित्यने लंडन ड्रीम्स, अॅक्शन रिप्ले,गुजारिश,आशिकी 2,ये जवानी है दिवानी,दावत- ए- इश्क,फितुर,डिअर जिंदगी,ओके जानु सिनेमात वेगवेगळ्या भूमिका साकारत भरघोस मनोरंजन करत रसिकांची वाहवा मिळवली आहे.

Web Title: Will Aditya Roy Kapoor choose the movie?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.