- तर पूर्ण होणार शाहरूख-सलमानच्या चाहत्यांची इच्छा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2016 01:48 PM2016-11-01T13:48:50+5:302016-11-01T13:48:50+5:30
‘किंगखान’ शाहरूख खान आणि बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, शाहरूख व सलमान ...
‘ िंगखान’ शाहरूख खान आणि बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, शाहरूख व सलमान यांना पुन्हा पडद्यावर एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. होय, तब्बल नऊ वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार असल्याची बातमी आहे. सध्या सलमान कबीर खान दिग्दर्शित ‘ट्युबलाईट’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटात शाहरूख व सलमान ही जोडी एकत्र दिसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘ट्युबलाईट’मध्ये एसआरके कॅमिओ करताना दिसेल. आधी या कॅमिओसाठी शत्रूघ्न सिन्हा यांचे नाव निश्चित झाले होते. मात्र आता ही भूमिका एसआरके करणार असल्याची खबर आहे. असे झालेच तर बॉलिवूडच्या तमाम चाहत्यांची सलमान व शाहरूखला एकत्र पाहण्याची इच्छा पूर्ण होणार आहे. शिवाय कबीर खान यांच्यासाठीही सुद्धा हा ‘फायद्याचा सौदा’ ठरणार आहे.
सन २००७ मध्ये ‘ओम शांति ओम’ या चित्रपटात हे दोघे एका फ्रेममध्ये दिसले होते. सलमान व शाहरूख ही जोडी ‘करण अर्जून’ आणि ‘हर दिल जो प्यार करेगा’ या चित्रपटांत एकत्र दिसली होती. तोपर्यंत दोघांचेही संबंध अतिशय चांगले होते. मात्र ‘चलते-चलते’पासून या दोघांचे संबंध बिघडले होते. या चित्रपटात सलमानची तत्कालिन प्रेयसी ऐश्वर्या राय मु्ख्य भूमिकेत होती. एकेदिवशी या चित्रपटाच्या सेटवर पोहोचून सलमानने जोरदार धिंगाणा घातला. शिवाय शाहरूखला नाही नाही ते बोलला. यानंतर शाहरूखने या ऐश्वर्याला हटवून या चित्रपटात राणी मुखर्जीला घेतले. तेव्हापासून दोघांचेही सबंध विकोपाला गेले होते. मात्र गेल्या दोन वर्षांत हे संबंध पुन्हा एकदा पूर्ववत झाल्याचे दिसत आहे.