प्रभाससोबत क्रिती सनॉन बांधणार लग्नगाठ?, अभिनेत्रीनं लग्नाच्या तारखेबाबत केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 11:33 AM2022-11-30T11:33:59+5:302022-11-30T11:34:32+5:30
Kriti Sanon And Prabhas : आतापर्यंत क्रिती सनॉनने प्रभाससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तावर मौन बाळगले होते. पण आता क्रितीने एका पोस्टद्वारे प्रभास आणि तिच्या नात्याचे सत्य सांगितले आहे.
साऊथचे सुपरस्टार प्रभास (Prabhas) आणि क्रिती सनॉन (Kriti Sanon) गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या अफेअरच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. या दोघांच्या लग्नाची चर्चा सर्वत्र पसरली आहे. या दोघांमध्ये काय चालले आहे हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता खुद्द क्रितीने तिच्या लग्नाच्या आणि प्रभाससोबतच्या अफेअरबाबत सत्य सांगितले आहे.
आतापर्यंत क्रिती सनॉनने प्रभाससोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या वृत्तावर मौन बाळगले होते. पण आता क्रितीने एका पोस्टद्वारे प्रभास आणि तिच्या नात्याचे सत्य सांगितले आहे. क्रितीने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले की, ना ये प्यार है ना ही पीआर… हमारा भेडिया (वरुण धवन) रिअॅलिटी शोमध्ये जरा जास्तच वाइल्ड झाला होता. त्याच्या या मजेशीर वक्तव्यानंतर अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत.
क्रितीने पुढे लिहिले की, काही पोर्टल माझ्या लग्नाची तारीख जाहीर करण्यापूर्वी, मला तुमचे गैरसमज दूर करायचा आहे. या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत. यामध्ये तथ्य नाही. नुकतेच क्रिती सनॉन आणि वरुण धवन झलक दिखला जा शोमध्ये त्यांच्या भेडिया चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते. त्यानंतर वरुण क्रितीच्या लव्ह लाईफबद्दल बोलताना दिसला. वरुण म्हणाला होता की, क्रितीचे नाव कुणाच्या तरी हृदयात आहे. यावर करण जोहरने विचारले होते की, कोणाच्या हृदयात आहे? तेव्हा वरुण धवन म्हणाला की, एक माणूस आहे जो मुंबईत नाही, तो सध्या दीपिका पदुकोणसोबत शूटिंग करत आहे. वरुण धवनचे हे उत्तर ऐकून क्रिती सेनन हसू लागली. तर करण जोहर चकीत झाला.
वरुण धवनच्या बोलण्यावर क्रितीने ज्याप्रकारे कावरी होऊन प्रतिक्रिया दिली, त्यावरून अनेकांना असे वाटले की वरुण प्रभास आणि क्रितीच्या नात्याबद्दल बोलत आहे. वरुण धवनने क्रिती आणि प्रभासच्या नात्याला पुष्टी दिली आहे, असे अनेकांना वाटले. तेव्हापासून या दोन्ही स्टार्सच्या प्रेमप्रकरणाच्या चर्चांना उधाण आलं.