'किसी का भाई किसी का जान' फ्लॉप झाल्यामुळे सलमान खान घेणार ब्रेक? जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2023 07:54 PM2023-05-03T19:54:58+5:302023-05-03T19:55:28+5:30

Salman Khan : सलमान खानचा मल्टिस्टारर चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट रिलीज होऊन आठवडा उलटला तरी अद्याप चित्रपटाला भारतात १०० कोटींचा गल्ला जमवता आला नाही.

Will Salman Khan take a break due to 'Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan' flop? Learn about | 'किसी का भाई किसी का जान' फ्लॉप झाल्यामुळे सलमान खान घेणार ब्रेक? जाणून घ्या याबद्दल

'किसी का भाई किसी का जान' फ्लॉप झाल्यामुळे सलमान खान घेणार ब्रेक? जाणून घ्या याबद्दल

googlenewsNext

सलमान खान(Salman Khan)चा बहुचर्चित चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’(Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan)ने अपेक्षित तेवढी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही. हा चित्रपट २१ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपट प्रदर्शित होऊन आठवडा झाला तरी अद्याप चित्रपट भारतात १०० कोटींचा गल्ला जमवू शकला नाही. मात्र, जगभरात चित्रपटाने १५० कोटींचा आकडा पार केला आहे. यामुळेच आता सलमान खानने एक मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. त्यामुळे पुढील वर्षी ईदला सलमान खानकडून त्यांच्या चाहत्यांना खास सरप्राईज मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले.

‘ट्यूबलाइट’पासून ‘राधे’पर्यंत सलमान खानचे सध्या ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेले चित्रपट फारसे चालले नाहीत. तसेच नुकताच आलेला ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपटही फारशी कमाल दाखवू शकला नाही. पुढील चित्रपटांच्या बाबतीत सलमान खान विचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एका न्यूज पोर्टलनुसार सलमान खानला तब्बल ६ चित्रपट ऑफर झाले आहेत. आता नवीन चित्रपट करण्यास सलमान तयार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सलमानचा आगामी चित्रपट टायगर ३ हा नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. त्यासाठी सलमान खानने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सलमानच्या आगामी चित्रपटांवरदेखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

दिवाळीला रिलीज होणाऱ्या ‘टायगर ३’ या चित्रपटाला मिळणाऱ्या प्रतिसादावर पुढे कोणत्या चित्रपटांना होकार द्यायचा असा निर्णय सलमानने घेतल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. २०२४ च्या ईदला सलमानचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नसेल ही गोष्ट त्याच्या चाहत्यांसाठी निराशाजनक असेल. सलमानच्या ‘टायगर ३’ची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. याचे दिग्दर्शन मनीष शर्माने केले आहे.  यात शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Web Title: Will Salman Khan take a break due to 'Kisi Ka Bhai Kisi Ka Jaan' flop? Learn about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.