तब्बल 9 वर्षांनंतर सलमान खान सोबत काम करणार हा अभिनेता ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 10:34 AM2017-11-09T10:34:51+5:302017-11-09T16:11:45+5:30
सलमान खान आणि अनिल कपूरची मैत्री जगजाहिर आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि अॅवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांच्यातले नातं सगळ्यांनी बघितले आहे. ...
स मान खान आणि अनिल कपूरची मैत्री जगजाहिर आहे. अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि अॅवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांच्यातले नातं सगळ्यांनी बघितले आहे. चित्रपटात ही जोडी हिट आहे. सलमान आणि अनिल कपूरच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खूशखबरी आहे. जवळपास हे दोन कलाकार तब्बल 9 वर्षांनी एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. तुम्हाला वाटले असेल की दोघे नो एंट्रीच्या सीक्वलमध्ये एकत्र दिसणार आहेत तर हे चुकीचे आहे. सलमान आणि अनिल रेस 3 मध्ये एकत्र दिसण्याची शक्यता आहे.
तुम्हाला लक्षात असेलच की रेस सीरिजच्या पहिल्या दोन चित्रपटात अनिल कपूरने आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले होते. डीएनएला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'अनिल कपूरने रेसच्या सीरिजमध्ये आतापर्यंत रॉबर्ट डिस्कॉस्टा नावाची भूमिका साकारली आहे. जो एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह असतो. अनिल कपूरने साकारलेली ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. अनिल कपूरचे नाव 'रेस 3'साठी जर फायनल झाले तर तो तो एकमेव असा अभिनेता असले जो रेसच्या आतापर्यंतच्या सगळ्या सीरीजमध्ये दिसले. तसेच पहिल्यांदाच रेमो डिसुजा आणि अनिल कपूर एकत्र काम करणार आहेत.
या चित्रपटाचे शूटिंग आजपासून सुरुवात करणात आले आहे. ह्याआधीच्या चित्रपटाचे पहिले शूटिंग अबु धाबीमध्ये होणार होते. पण सलमान खानचे व्यस्त शेड्युल बघता मेकर्सनी प्लॅन बदलला आता ह्या चित्रपटाचे पहिले शूटिंग मुबंईमध्ये होणार आहे. हा चित्रपट मेकर्सला २०१८च्या ईदला रिलीज करायचा आहे त्यामुळे त्यांची इच्छा आहे की हा चित्रपट लवकरात लवकर पूर्ण हावा. यात जॅकलिन फर्नांडिसही दिसणार आहे.
ALSO RAED : २०० कोटी कमावले तरीही फ्लॉप म्हणूनच गणल्या जाईल ‘टायगर जिंदा है’! वाचा कारण!!
सध्या अनिल कपूर फन्ने खानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर ख्रिसमच्या मुहुर्तावर सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट ख्रिसमच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या चित्रपटातील गाणं सलमान आणि कॅटरिना ग्रीसमध्ये शूट करुन आले आहे. तब्बल पाच वर्षांनी दोघांची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. टायगर जिंदा है हा चित्रपट २०१२ मध्ये आलेला एक था टायगरचा सिक्वेल आहे.