इतक्या प्रयत्नानंतरही होणार का सलमान खान -कबीर खानचे पॅचअप ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 08:52 AM2018-08-14T08:52:14+5:302018-08-14T08:53:27+5:30

सलमान आणि कबीर एकेकाळचे जवळचे मित्र. पण ‘ट्युबलाईट’नंतर दोघांत असे काही बिनसले की, अनेक वर्षांची मैत्रीही तुटली. 

will salman khanbecome friend of kabir khan again? | इतक्या प्रयत्नानंतरही होणार का सलमान खान -कबीर खानचे पॅचअप ?

इतक्या प्रयत्नानंतरही होणार का सलमान खान -कबीर खानचे पॅचअप ?

googlenewsNext

गतवर्षी सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ दणकून आपटला़ हा सलमानसाठी मोठा धक्का होता. कारण सलमान या चित्रपटाचा निर्माता होता. शिवाय वितरकांना झालेल्या तोट्याची भरपाईही त्याला करावी लागली होती. या चित्रपटाचा दिग्दर्शक होता कबीर खान. खरे तर सलमान आणि कबीर एकेकाळचे जवळचे मित्र. पण ‘ट्युबलाईट’नंतर दोघांत असे काही बिनसले की, अनेक वर्षांची मैत्रीही तुटली. सलमानच्या मते, चित्रपट तर खराब होताचं पण सोबतचं तो ओव्हरबजेटही होता. या चित्रपटानंतर सलमानने कबीरसोबतचे सगळे संबंध तोडलेत. त्याच्यासोबत बोलणे बंद केले. त्याच्यासोबतचे काही पूर्वनियोजित प्रोजेक्टही त्याने थांबवलेत. केवळ इतकेच नाही तर कबीरचा ‘वचपा’ काढण्यासाठी त्याने दिग्दर्शक अली अब्बास जफरला प्रमोट करणे सुरू केले. अलीच्या ‘टायगर जिंदा है’ने सलमानची गाडी पुन्हा रूळावर आली. पण कबीरने मात्र यानंतर एकही चित्रपट बनवला नाही. आता ही इतकी पार्श्वभूमी सांगण्याचे कारण म्हणजे, सलमान व कबीरचे संबंध पूर्ववत करण्यासाठी काही लोकांची सुरू असलेली धडपड.

 होय, सलमान व कबीरमध्ये पॅचअप व्हावे, यासाठी काही लोकांनी मनापासून प्रयत्न चालवले आहेत. यात कबीरची पत्नी मिनी माथूर सर्वाधिक आघाडीवर आहे. तिने सलमानच्या कुटुंबाशी यासंदर्भात संपर्क साधला आहे. सलमानच्या बहीणी मिनीच्या मैत्रिणी आहेत. मिनीने आपल्या या मैत्रिणींसोबत मिळून एका पार्टीचे नियोजन केले आहे. या पार्टीच्या निमित्ताने कबीर व सलमानला एकत्र आणणे हाच सगळयांचा हेतू आहे. ही पार्टी यशस्वी झालीचं तर कबीर व सलमान पुन्हा मित्र बनणार आहेत. त्यामुळे साहजिकचं या पार्टीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

 

Web Title: will salman khanbecome friend of kabir khan again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.